Devendra Fadnavis: काही अकाऊंटला प्रॉब्लेम निधी रिलीज करण्यात अडचणी.... फडणवीसांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर केलं वक्तव्य

शेतकऱ्यांना मदत न पोहचण्यावरून मंत्रीमंडळ बैठकीत मंत्री अन् अधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी
Devendra Fadnavis
Devendra FadnavisPudhari Photo
Published on
Updated on

Devendra Fadnavis:

मुंबईत आज (दि. २८ ऑक्टोबर) मंत्री मंडळाची बैठक झाली. या वादळी बैठकीत मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत पोहचण्यावरून चांगलीच खडाजंगी झाली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आतापर्यंत करण्यात आलेल्या मदतीची माहिती दिली. यावेळी त्यांनी काही अकाऊंट्सना प्रॉब्लेम येत असल्यानं निधी रिलीज करण्यात अडचणी आल्याचं सांगितलं.

Devendra Fadnavis
Cabinet Meeting: शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचलीच नाही! कॅबिनेट बैठकीत राडा; मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी; नेमकं काय घडलं?

मंत्रीमंडळाच्या बैठकीतनंतर फडणवीसांनी अतीवृष्टीमुळं नुकासन झालेल्या शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या मदतीचा आढावा घेतल्याचं सांगितलं. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आतापर्यंत ८ हजार कोटी रूपये मदत म्हणून रिलीज करण्यात आले आहेत. जवळपास ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहचले आहेत. आजच्या बैठकीत ११ हजार कोटी रूपयांच्या मदतीला मान्यता देण्यात आली आहे.'

फडणवीस पुढे म्हणाले की, 'हा निधी बजेटमधला नाही त्यामुळं त्याला मंजुरी देण्यात आली आहेत. हा निधी वेगवेगळ्या जिल्ह्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं गेला आहे. आम्ही जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची असं बोललो होतो. ज्यांना २ हेक्टरचे पैसे मिळाले आहेत. त्यांना तीन हेक्टरचे देखील पैसे मिळतील.'

काही शेतकऱ्यांना अजून मदत मिळालेली नाही यावर फडणवीस म्हणाले की, 'आम्ही १५ ते २० दिवसात पैसे देण्याचा प्रयत्न करू, काहींच्या अकाऊंटचा प्रॉब्लेम आहे. रिलीजला अडचणी येत आहेत. आम्ही पात्र शेतकरी सुटू नये याचा प्रयत्न करतोय. मोठ्या प्रमाणात शेती माल खरेदीचा प्रश्न देखील आला आहे. आम्ही आधी रजिस्ट्रेशन करतोय आणि त्यानंतर खरेदी करतोय. शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करा. व्यापारी जर हमीभावापेक्षा कमी भाव देत असतील तर शेतीमाल आम्हाला विका.'

'

Devendra Fadnavis
Thane Crime: ठाण्यातील धक्कादायक प्रकार! १७ वर्षाच्या मुलानं वादानंतर गर्लफ्रेंडला पेटवलं; आई वडील येताच...

फडणवीस यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी सुरू केल्याच्या वृत्ताचाही समाचार घेतला. त्यांनी नी स्पष्ट केले की, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची (VSI) कोणतीही चौकशी सरकारने सुरू केलेली नाही. गाळप हंगामाच्या बैठकीत केवळ संस्थेकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन कापल्या जाणाऱ्या १ रुपयाच्या वर्गणीसह इतर पैशांचा विनियोग कसा होतो, याची माहिती साखर आयुक्तांनी मागितली आहे आणि यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल.

दरम्यान, फडणवीस यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. ते म्हणाले, 'काही जण खोटे डॉक्युमेंट घरीच तयार करत आहेत. आजच रोहित पवार यांनी दाखवलेले कागदपत्र खोटं निघालं आहे, आता त्यासंदर्भात एफआयआर (FIR) दाखल होत आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news