Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा राज्यातील आवडता हिंदुत्ववादी नेता कोण? मुख्यमंत्र्यांनी दिलं भन्नाट उत्तर

Devendra Fadnavis Favourite Hindutva Leader: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे, संग्राम जगताप आणि महेश लांडगे यांच्यापैकी कोण आवडता हिंदुत्ववादी नेता आहे, यावर स्पष्ट उत्तर दिलं.
Devendra Fadnavis on Hindutva
Devendra Fadnavis on Hindutva Pudhari
Published on
Updated on

Devendra Fadnavis on Hindutva: नितेश राणे, संग्राम जगताप की महेश लांडगे... या तिघांपैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आवडता हिंदुत्ववादी नेता नेमका कोण? या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘पुढारी न्यूज महासमिट’मध्ये फडणवीस यांची विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी हिंदुत्व, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकतेवर भाष्य करताना त्यांनी या तिन्ही नेत्यांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

नितेश राणे, संग्राम जगताप की महेश लांडगे?

‘पुढारी न्यूज’च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत महासमिटचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विविध मुद्द्यांवर सविस्तर मुलाखत झाली. यावेळी त्यांना नितेश राणे, संग्राम जगताप आणि महेश लांडगे यांच्यापैकी तुमचा आवडता हिंदुत्ववादी नेता कोण? असा थेट प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर फडणवीसांनी तिघेही हिंदुत्वासाठी काम करणारे नेते असल्याचं सांगितलं.

‘हे तिघेही हिंदू नायक’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हे तिघेही हिंदू नायक आहेत आणि हिंदुत्वासाठी काम करत आहेत. त्यांनी हिंदुत्वासाठीच काम केलं पाहिजे. मात्र, हिंदुत्वासाठी काम करताना मूलभूत भूमिका आणि विचार समजून घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

फडणवीस यांनी हिंदुत्वात सहिष्णुतेला महत्त्वाचं स्थान असल्याचं सांगितलं. त्यांच्या मते हिंदुत्वाचा मूळ गाभाच सहिष्णुता आहे आणि ही भूमिका समजून घेणं गरजेचं आहे.

Devendra Fadnavis on Hindutva
Pudhari News Mahasummit 2026: पीएम इन वेटिंग कधीच कन्फर्म झालेले नाही!

‘सहिष्णुता हाच हिंदुत्वाचा दागिना’

हिंदुत्वाची भूमिका ही सर्वसमावेशक असली पाहिजे, असं सांगताना फडणवीस यांनी त्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतला जाऊ नये, असंही स्पष्ट केलं.

ते म्हणाले की, सर्वसमावेशकतेचा अर्थ असा नाही की कोणी आपल्यावर अन्याय केला किंवा हल्ला केला तरी आपण काहीच प्रतिक्रिया देऊ नये. मात्र, स्वतःहून कोणावरही अन्याय किंवा आक्रमण करू नये, असा त्यांचा स्पष्ट संदेश होता.

यावेळी त्यांनी हिंदू समाजाच्या सहिष्णू वृत्तीचा उल्लेख करत ‘हिंदू सहिष्णूच आहे आणि तो सहिष्णूच राहिला पाहिजे. सहिष्णुता हाच हिंदुत्वाचा दागिना आहे,’ असं सांगितलं.

Devendra Fadnavis on Hindutva
Pudhari News Mahasummit 2026: ‘दिमागी नक्षल’ विचारांचा महाराष्ट्र तर हॉटबेड !

हिंदुत्वासोबत सर्वसमावेशकतेवर भर

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे नितेश राणे, संग्राम जगताप आणि महेश लांडगे या तिघांपैकी कोणाला ते अधिक पसंती देतात, यापेक्षा हिंदुत्वाबाबत त्यांची भूमिका काय आहे, हे स्पष्ट झालं.

हिंदुत्वाचा विचार मांडताना सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता यांचा समतोल राखला पाहिजे, असा संदेश फडणवीस यांनी या मुलाखतीतून दिला. ‘पुढारी न्यूज महासमिट’मध्ये झालेल्या या चर्चेची राजकीय वर्तुळातही चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news