

मुंबई: नेतृत्वविरहित किंवा 'फेसलेस' आंदोलनांमध्ये काही स्वार्थी प्रवृत्ती घुसून आंदोलनाचा वापर स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी करतात. दिल्लीतील आंदोलनातही काही राजकीय पक्ष आणि विविध संघटना स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केला.
दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबत जबाबदाऱ्यांचाही विचार केला पाहिजे.
परवानगी घेऊन शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना प्रशासन सहकार्य करेल. तथापि, विनापरवानगी आंदोलन, हिंसा आणि जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला.