Devendra Fadnavis: जनतेपर्यंत चर्चेऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर चुकीचं; फडणवीसांच्या आमदारांना कानपिचक्या

अंतिम आठवडा प्रस्‍तावावर उत्तर देताना विधानसभेमध्ये मांडले मारामारीच्या घटनेवर सविस्‍तर मत
Devendra Fadnavis
Devendra FadnavisPudhari Photo
Published on
Updated on

If the message of beatings is being conveyed to the public instead of discussions, it is wrong; Fadnavis' MLAs are being harassed

मुंबई : कालच्या मारामारीच्या घटनेची माझ्या देखील मनात खंत आहे ही विधानसभा ही मंत्री, आमदार यांच्या मालकीची नाही ही विधानसभा जनतेच्या मालकीची आहे. आणि लाथा बुक्क्याचा संदेश जनतेपर्यंत जात असेल तर चिंता करण्याची गोष्ट आहे. अशा कानपिचक्‍या सर्व आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात दिल्‍या. अंतिम आठवडा प्रस्‍तावावर उत्तर देताना ते विधानसभेत बोलत होते.

काल गोपीनाथ पडळकर व जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली मारामारी ही खूप गंभीर आहे. त्‍यामुळे कोणत्‍या सदस्‍याबरोबर कोण येतय याबाबत शिस्‍त असली पाहिजे. काल या मारामारीत सहभागी असलेल्‍या ऋषिकेश टकले यावर सहा गुन्हे आहेत तर नितीन देशमुख वर ८ गुन्हे आहेत. अशी मंडळी येऊन मारामारी करतात, हे योग्य नाही. अध्यक्षांनी घेतलेला निर्णय योग्य त्‍यामुळे काही लोकांनी काहींनी चूक केली म्हणून सर्वांना शिक्षा नको अशा शब्‍दात मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मत मांडले.

Devendra Fadnavis
Clash In Maharashtra Assembly Lobby | विधीमंडळ लॉबीतील हाणामारी प्रकरणी विधानसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय, पडळकरांकडून खेद व्यक्त, आव्हाड म्हणाले...

कोणत्‍याही अभ्‍यागतला बिल्‍ला कंपल्‍सरी

अंतिम आठवडा प्रस्‍तावावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले यावेळी त्‍यांनी काल घडलेल्‍या प्रकारावर सविस्‍तर मत मांडले. पुढे बोलताना विधीमंडळ परिसरात योग्य सुरक्षा व्यवस्था उभारा, कुठलाही अभ्यागत येऊ द्या बिल्ल्याशिवाय तो दिसता कामा नये. त्‍यामुळे यापुढे असे प्रकार होऊ नये यासाठी प्रत्‍येकाला बिल्‍ला कंपल्‍सरी केला पाहिजे. आमदार बिल्ला लावून येतात पण किमान गळ्यात एक ओळखपत्र असावे अशाही सूचना त्‍यांनी केल्‍या.

एखाद्याने येऊन आतंकवादी घटना केली तर जबाबदारी कोण

पुढे ते म्‍हणाले की असे कोणीही आले आणी आतंकवादी घटना केली तर त्‍याला कोण जबाबदार. असा सवाल उपस्‍थित केला त्‍यामुळे ओळखपत्र असणे गरजेचे आहे. ज्‍याच्याकडे ओळखपत्र नसेल त्‍याला नाहीतर सुरक्षा रक्षकांनी त्यास बाहेर काढावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यानी केल्‍या.

कालच्या घटनेवर दोन्ही सदस्‍यांची दिलगिरी

दरम्‍यान कालच्या घटनेवर आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) सभागृहात खेद व्यक्त केला. मी आपण दिलेल्या सूचनांचे पालन करेन, असेही ते म्हणाले. तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले की, मी सभागृहात एकटाच येतो. मी कुणाच्या पासवर सही करत नाही. ज्यावेळी घटना घडली तेव्हा मी सभागृहात नव्हतो. या घटनेशी माझा कुठलाही संबंध नाही.

Devendra Fadnavis
Gopichand Padalkar Jitendra Awhad Clash: विधानभवनात मारामारी करणारा हाच 'तो' कार्यकर्ता, कोण आहे ऋषिकेश टकले?

शब्दातून निघणारे विष असते ते नागाच्या विषा पेक्षा जहरीले असते

पुढे त्‍यांनी कुणी मीडिया समोर अश्लील घोषणा देते कुणी अध्यक्ष मॅनेज आहेत असे म्हणतंय आपण माणसं आहोत, राग अनावर होतो पण आपला चर्चेचा स्थायीभाव हा डिस्कशन असावाकुणी मीडियासमोर अश्लील बोलत आहे कुणी अध्यक्षांसमोर अध्यक्ष मॅनेज असल्याचे बोलतेय अशा शब्‍दात विरोधकांना टोला लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news