Devender Singh BMC: वादग्रस्त अधिकारी देवेंदर सिंग मुंबई महापालिकेच्या सहआयुक्तपदी; आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राहुल रेखावार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नवे सचिव; प्रशासनात मोठे फेरबदल
BMC Budget
BMC BudgetPudhari
Published on
Updated on

- आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

- राहुल रेखावर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्डाचे नवे सचिव

मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर  राहिल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आलेले व नंतर सरकारने ही कारवाई मागे घेतलेले महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंग यांची मुंबई महापालिकेत सहआयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. तर सिंग यांच्या जागी राहुल रेखावार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

BMC Budget
Ambedkar Adarsh School: राज्यात 405 ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’; विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची नवी संधी

विधिमंडळाच्या अधिवेशनाचे सूप वाजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात फेरबदल सुरू केले. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशीरा आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार महामुंबई मेट्रो महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अगरवाल यांची बदली कोकण विभागीय आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.

BMC Budget
Vasai Crime: ‘महादेवाचा अवतार’ सांगत महिलेची फसवणूक; स्वयंघोषित धर्मगुरुविरोधात गुन्हा

महिला आणि बालविकास आयुक्त नयना गुंडे यांची बदली अमरावती विभागीय आयुक्तपदी,तर अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची नियुक्ती महामुंबई मेट्रो महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी झाली आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर पाठवण्यात आले आहे.

BMC Budget
Uddhav Thackeray | लढायचे नसेल तर सांगा, मी थांबतो!

धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष यांची बदली सांगली जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे. तर प्रियंवदा म्हाडदळकर यांची नियुक्ती धाराशिव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news