Anmol Bishnoi: गँगस्टर बिश्नोईच्या चौकशीचे मुंबई पोलिसांपुढे नवे आव्हान; बाबा सिद्दिकी हत्येचा तपास रखडणार?

दिल्ली न्यायालयाने कोठडी अर्ज फेटाळला
Bishnoi
Bishnoi Pudhari
Published on
Updated on

मुंबई: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी आणि लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याच्या चौकशीसाठी मुंबई पोलिसांसमोर नवे कायदेशीर आव्हान उभे राहिले आहे. दिल्लीतील न्यायालयाने अनमोल बिश्नोईला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी फेटाळल्याने या प्रकरणाचा तपास रखडण्याची शक्यता जास्त आहे.

अनमोल बिश्नोई सध्या दिल्लीतील तिहार कारागृहात असून, त्याच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) एका स्वतंत्र प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आरोपी अनमोलला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यास दिल्ली विशेष न्यायालयाने नकार दिल्याने त्याची प्रत्यक्ष कोठडी मिळवण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे.

Bishnoi
BArch CET Registration Last Date: आर्किटेक्चर प्रवेश नोंदणी २८ जुलैपर्यंत करता येणार

यापूर्वी विशेष मकोका न्यायालयाने मुंबई गुन्हे शाखेवर ताशेरे ओढले होते. अनमोल बिश्नोईचा तपास करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न न केल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते. तसेच न्यायालयाने कायद्यानुसार सर्व पर्यायांचा अवलंब करून त्याची चौकशी सुनिश्चित करण्याचे निर्देशही दिले होते.

Bishnoi
B.Pharm Syllabus: जुन्याच अभ्यासक्रमानुसार पूर्ण करता येणार बी.फार्म; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

दरम्यान, सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेरील गोळीबार प्रकरणातही अनमोल बिश्नोई हा वाँटेड आरोपी आहे. अनमोल मुंबई पोलिसांच्या ताब्यात आल्यास याबाबतचा तपास केला जाईल.

पोलिसांना उचलावी लागणार कायदेशीर पावले

तपास यंत्रणांच्या मते, अनमोल बिश्नोईची चौकशी झाल्यास बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सलमान खान गोळीबार प्रकरण तसेच बिश्नोई टोळीच्या आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्याबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. मात्र, दिल्ली न्यायालयाच्या ताज्या निर्णयामुळे अनमोलला चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांना आणखी काही कायदेशीर पावले उचलावी लागणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news