Deepak Kesarkar on Ashok Kharat: "ज्योतिषाकडे सगळेच जातात पण..." : खरात सोबतच्या फोटोंवर दीपक केसरकरांची पहिली प्रतिक्रिया

Ashok Kharat videos: महिलांवरील बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला स्वयंघोषित ज्योतिषी भोंदूबाबा अशोक खरात याच्यासोबत दीपक केसरकर यांचे फोटो समोर आले आहेत. यावर केसरक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Deepak Kesarkar on Ashok Kharat
Deepak Kesarkar on Ashok Kharatfile photo
Published on
Updated on

Deepak Kesarkar on Ashok Kharat

मुंबई: महिलांवरील बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला स्वयंघोषित ज्योतिषी भोंदूबाबा अशोक खरात याला पाठीशी घालणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर तातडीने राजीनामा द्यावा लागला. दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांची खरात याच्याबरोबर ऊठबस आहे. खरात याच्यासोबत अनेक नेत्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांचेही फोटो समोर आले आहेत. यावर आता केसरक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले दिपक केसरकर?

पुढारी न्युजला दिलेल्या प्रतिक्रियेत केसरकर म्हणाले की, "माझा या घटनेशी काही संबंध नाही. खरात वैयक्तिक आयुष्यात काय करतो, याच्याही माझा काहीच संबंध नाही. ज्योतिषाकडे सर्वजण जातात. पण त्याने काय केलं आहे हे मला माहीत नाही. पण त्याने काही केलं असेल तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी माझा काही संबंध नाही."

१०० हून अधिक व्हिडिओ जप्त

स्वतः कृष्णाचा अवतार असल्याचे सांगत धार्मिक विधींच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. नाशिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे. पोलिस मुख्यालयातील हिमांशू बंगल्यात दिवसभर चौकशी सत्र सुरू होते. तपास यंत्रणा अत्यंत गोपनीय पद्धतीने पुरावे गोळा करत आहेत. या प्रकरणात मोठ्या व्यक्तींचा संबंध उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणातील प्रमुख संशयित खरात याचा कार्यालयीन शिपाई नीरज जाधव हा अखेर समोर आला आहे. जाधवनेच संबंधित व्हिडिओ व्हायरल करत महिलांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. पोलिसांनी केलेल्या छापेमारीत १०० हून अधिक व्हिडिओ मिळाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news