

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने पावसाळापूर्व केलेल्या सर्वेक्षणात शहरातील धेोकादायक इमारतींची संख्या पाचशेवर (504) गेल्याचे उघड झाले असून यात 52 इमारती या अतिधोकादायक आहेत. यात बेलापूर विभागात सर्वाधिक 102 इमारतींचा समावेश आहे.
शहरात यावर्षी कोपरखैरणे येथे स्लॅब कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता तर नेरुळ येथेही नुकततीचस्बॅल कोसळण्याची घटना घडली होती. त्यामुळे पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण हाती घेतले होते. हे सर्वेक्षण पूर्ण झाले असून बुधवारी हा अहवाल पालिकेके जाहीर केला.
यात अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ निष्कासित करणे अशा ‘सी-1’ प्रवर्गामध्ये 52 इमारती, इमारत रिकामी करून संरचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-2 ए’ प्रवर्गामध्ये 102 इमारती आणि इमारत रिकामी न करता रचनात्मक दुरूस्ती करणे अशा ‘सी-2 बी’ प्रवर्गामध्ये 297 इमारती, इमारतीची किरकोळ दुरूस्ती या ‘सी-3’ प्रवर्गामध्ये 53 इमारती असल्याचे जाहीर केले आहे.
या इमारतींचा वापर टाळण्यासाठी वारंवार नोटीसा बजावल्या आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारे धोकादायक परिस्थिती उद्भवल्यास त्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
धोकादायक इमारती
प्रकार इमारत
सी 1 - 52
सी 2 ए - 102
सी 2 बी - 297
सी 3 - 53
विभाग इमारत
दिघा - 9
ऐरोली - 8
घनसोली - 25
कोपरखैराणे - 33
नेरूळ - 69
तुर्भे - 73
बेलापूर -102