Stock advisory fraud : शेअर गुंतवणूक सल्ला महागात!

26 लाखांची फसवणूक, व्यावसायिकाला अटक
Stock advisory fraud
शेअर गुंतवणूक सल्ला महागात!pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : एनएसईच्या शेअर विक्रीच्या नावाने एका खासगी कंपनीच्या 36 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी रजत अमरचंद्र जैन या व्यावसायिकाला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. तक्रारदार बोरिवली येथे राहत असून एका खासगी कंपनीत शेअरसंबंधित सल्लागार म्हणून काम करतात. या कंपनीला एनएसईच्या पाच हजार अनलिस्टेड शेअरची गरज होती. याच दरम्यान त्यांची रजत जैनशी ओळख झाली होती.

ठरल्याप्रमाणे तक्रारदाराच्या कंपनीला त्याला टीडीएस कापून 94 लाख 95 हजार 500 रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र ही रक्कम पाठवूनही रजतने त्याला पेमेंट मिळाला नसल्याचे सांगून शेअर ट्रान्स्फर करण्यास नकार दिला होता. या घटनेनंतर त्यांनी पैसे ट्रान्स्फर झाल्याचे पुरावे पाठविले होते. तरीही त्याने त्यांना शेअर पाठविले होते. त्यामुळे तक्रारदार त्यांच्या सहकाऱ्यासोबत रजत जैनच्या बंगलोर येथील घरी गेले होते. त्यांनी त्याला शेअर ट्रान्स्फर करण्याची किंवा पैसे परत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्याने त्यांना 54 लाख रुपये ट्रान्स्फर केले तर उर्वरित रक्कम जून महिन्यांत ट्रान्स्फर करण्याचे आश्वासन दिले होते.

Stock advisory fraud
Illegal bungalow demolished : मढमध्ये बेकायदेशीर बंगल्यावर मनपाचा बुलडोझर

2 जूनला त्याने आणखीन पाच लाख रुपये ट्रान्स्फर केले, मात्र उर्वरित 36 लाख रुपये परत केले नाही. वारंवार विनंती करुनही त्याने पैसे ट्रान्स्फर केले नाही. त्यामुळे तक्रारदारांनी त्याच्याविरुद्ध बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच रजत जैनला पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यांत अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवली स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनंतर त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

  • रजत हा बंगलरूचा रहिवाशी असून तो व्यावसायिक म्हणून काम करतो. त्याने त्याच्याकडे एनएसईचे दहा हजार शेअर असल्याचे सांगून त्यांना पाच हजार शेअर देण्याचे आश्वासन दिले होते. प्रति शेअर 1900 रुपयांमध्ये विक्रीची तयारी दर्शविल्यांनतर तक्रारदारांनी त्याला होकार दिला होता.

20 लाखांचा अपहार, सहा जणांविरुद्ध गुन्हा

मुंबई : चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी घेतलेल्या सुमारे वीस लाखांचा आनंदा ईश्वर आसबे, अरुणा आनंदा आसबे, अंकुश देशपांडे, रमेश यशवंत काळे, गजाजन अंबी व अन्य एका अशा सहाजणांच्या एका टोळीने अपहार करुन फसवणूक केल्याची घटना बोरिवली परिसरात घडली.

51 वर्षांची तक्रारदार महिला बोरिवलीतील गोराई परिसरात राहते. दोन वर्षांपूर्वी तिच्याच परिचित आनंदा आणि अरुणा यांनी तिला शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. आमिषाला बळी पडून तिने डिसेंबर 2023 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी 20 लाख 5 हजार 602 रुपये दिले होते. मात्र या गुंतवणुकीवर त्यांनी तिला कुठलाही परतावा दिला नाही.

याबाबत विचारणा केल्यानंतर ते तिला विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे तिने गुंतवणुक केलेल्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांनी मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम न देता तिची फसवणूक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती.

Stock advisory fraud
NCP mayor candidates : राष्ट्रवादीकडून माथेरान, कर्जतचे थेट नगराध्यक्षपदांचे उमेदवार जाहीर

14 लाखांची फसवणूक, महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई : शेअर गुंतवणुकीसाठी दिलेल्या पैशांचा वापर ऑनलाईन गेमसाठी करुन एका बहिण-भावाची सुमारे साडेचौदा लाखांची त्यांच्याच परिचित महिलेने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी भारती प्रकाश घाडी या महिलेविरुद्ध वाकोला पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

29 वर्षांची तक्रारदार तरुणी ही गोरेगाव येथे राहत असून ती अंधेरीतील एका विमा कंपनीच्या बॅक ऑफिसमध्ये युनिट सेल्स मॅनेजर म्हणून कामला आहे. याच ठिकाणी भातरी घाडी ही काम करत असल्याने त्या दोघीही एकमेकांच्या परिचित होत्या. तिला शेअरमध्ये ट्रेडिंग करायचे होते, त्यामुळे तिला भारतीने एक अकाऊंट उघडून दिले होते.

गुंतवणुकीवर तिने तिला 21 हजार आणि 50 हजार असे दोनदा परतावा दिला होता. त्यामुळे तिला तिच्यावर विश्वास बसला होता. तिच्यानंतर तिच्या भावानेही तिच्याकडे शेअरमध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या काही महिन्यांत या दोघांनी तिला शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी 14 लाख 60 हजार रुपये दिले होते. सुरुवातीला तिने त्याला काही रक्कम परत केली होती. मात्र नंतर तिने व्याजाची रक्कम देणे बंद केले.

याबाबत विचारणा केल्यानंतर तिने त्यांच्याकडून घेतलेले पैसे शेअरमध्ये गुंतवणुक न करता ऑनलाईन गेममध्ये पैसे ट्रान्स्फर केले होते. त्यात तिला प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे तिला त्यांना पेसे देता आले नाही. भारतीकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच या दोन्ही बहिण-भावांनी वाकोला पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिच्याविरुद्ध तक्रार केली होती.

  • भारतीने शेअरसह एफडी व म्युच्यअल फंडमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देत होते. तिच्यावर विश्वास ठेवून तिने तिच्यामार्फत शेअरमध्ये गुंतवुकीचा निर्णय घेतला होता. या गुंतवणुकीवर तिला तिने दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे तिने तिच्याकडे शेअरमध्ये गुंतवणुकीसाठी पैसे दिले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news