Political Criticism: 11 दिवसांत इंधनाच्या किमतीत 4 वेळा दरवाढ, हाच अमृतकाळ का? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असून ती सरकारने तात्काळ मागे घ्यावी
Harshvardhan Sapkal Targets BJP
Harshvardhan Sapkal Targets BJPPudhari Photo
Published on
Updated on

मुंबई: सत्तेत आल्यास पेट्रोल डिझेल 35 रुपये लिटरने देऊ अशा घोषणा करणाऱ्या मोदी सरकारच्या कालखंडात 12 वर्षापासून पेट्रोल-डिझेल-एलपीजी सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत.

11 दिवसातच पेट्रोल, डिझेलच्या किमती 8 रुपये प्रति लिटरने वाढवल्या आहेत. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असून ती सरकारने तात्काळ मागे घ्यावी, आणि हाच अमृतकाळ का?असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

Harshvardhan Sapkal Targets BJP
Vidhan Parishad Election: विधान परिषदेच्या तीन जागांसाठी शिवसेना, राष्ट्रवादीशी चर्चा सुरू: देवेंद्र फडणवीस

इराण युद्धाचे नाव पुढे करून केलेली दरवाढ ही दिशाभूल करणारी आहे. गेल्या 12 वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने, पेट्रोलच्या किमती 38 टक्क्यांनी, तर डिझेलच्या किमती 62 टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यावेळी तर इराण-इस्राईलचे युद्ध नव्हते. पेट्रोल डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या दरानुसार ठरतात हे सर्वांनाच माहीत आहे.

Harshvardhan Sapkal Targets BJP
School bus fare hike: आठवड्यात तीनच दिवस शाळा... अन्यथा भाडेवाढ; स्कूलबस संघटनेचा इशारा

डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचले असतानाही, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 72 रुपये लिटरच्या वर जाऊ दिल्या नाहीत. महागाईचा भार डॉ. मनमोहनसिंह यांनी जनतेवर पडू दिला नाही. याची आठवण सपकाळ यांनी करुन दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news