पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेसने ४७ उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी (दि.२४) जाहीर केली. यामध्ये नाना पटोले हे साकोली मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत तर पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणमधून निवडणूक लढणार आहेत. तर ब्रह्यपुरीतून विजय वडेट्टीवार, तिवसातून यशोमती ठाकूर, लातूरमधून अमित देशमुख या बड्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर परत एकदा कसब्यातून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. (Maharashtra Assembly Election| Nana Patole)
यासह कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील, कोल्हापूर करवीरमधून राहूल पाटील, हातकंगणले मतदारसंघातून राजू आवळे, पलुस- कडेगावमधून विश्वजित कदम, भोरमधून संग्राम थोपटे, जतमधून विक्रमसिंह सावंत, संगमनेरमधून विजय थोरात, लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख, मुराड पश्चिममधून अस्लम शेख, अमरावतीतून सुनिल देशमुख, अक्कलकोटमधून सिद्धराम म्हेत्रे, गोंदियातून गोपालदास अग्रवाल यांनाही काँग्रेसने संधी दिली आहे. (Maharashtra Assembly Election| Nana Patole)