Eid Procession | ईद मिरवणुकीत डीजेवर बंदी घालण्याची समाजाची मागणी

ईद मिलाद उन-नचीनिमित्त मुस्लीम बांधवांच्या परी तसेच धार्मिक ठिकाणी रोषणाई करण्यात येते
Eid Procession
Eid Procession File Photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यात पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन म्हणून साजन्या केल्या जाणाऱ्या ईद मिलाद उन-नबी निमित्त १६ आणि १७ सप्टेंबरला काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये (Eid Procession) डीजे तसेच लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घाला, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

ईद मिलाद उन-नचीनिमित्त मुस्लीम बांधवांच्या परी तसेच धार्मिक ठिकाणी रोषणाई करण्यात येते, मिरवणुका काढल्या जातात. गेल्या काही वर्षांत या मिरवणुकीचे स्वरूप पालटले आहे. त्यामुळे पुण्यातील झुबेर अहमद नजीर अहमद पीरजादे यांच्यासह ज्येष्ठ मुस्लीम बांधवांच्या वतीने अॅड. ओवेस पेचकर यांनी दाखल केलेल्या या यचिकेवर सोमवारी ९ सप्टेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Eid Procession
Lalbaugcha Raja 2024 : पाहा लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news