मुंबई : मुंबईतील लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) प्रथम दर्शन गुरुवारी (दि.5) गणेशभक्तांना घडले आणि गणपती बाप्पा मोरयाच्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. राजाचे पहिले दर्शन घडणार असल्याने मंडपात गर्दी उसळली होती. (Ganesh Chaturthi 2024)
उजव्या हातात चक्र आणि उजव्या पायाजवळ गदा ठेवून लालबागचा राजा सिंहासनावर विराजमान झाला आहे. गणपतीच्या डाव्या पायाजवळ मोदक घेऊन उंदीर बसला आहे. प्रथम दर्शनाच्या दिवशी गणपतीला मरून रंगाचा कद नेसवण्यात आला होता. पुढील ११ दिवस राजाची वस्त्रे रोज निरनिराळी असतील. लालबागच्या राजाचे हे ९१ वे वर्ष आहे. लालबागच्या राजाचा यंदाचा देखावा काशी विश्वनाथ मंदिराचा असून, मंडपाच्या एका बाजूला हातात महादेवाची मूर्ती उभारण्यात आली आहे