Colaba Ground Turf Controversy: कुलाब्यातील सबिना चंद्रशेखर मैदानावर टर्फला नागरिकांचा विरोध; काम थांबवले

नैसर्गिक पृष्ठभाग जपण्याची मागणी; स्थानिक खेळाडूंचा संताप, तर टर्फ खेळाडूंसाठी मोफत राहणार असल्याचा दावा
Colaba Ground Turf Controversy
Colaba Ground Turf ControversyPudhari
Published on
Updated on

मुंबई : कुलाबा येथील सबिना चंद्रशेखर मनोरंजन मैदानावर कृत्रिम पृष्ठभाग बसविण्याचे काम स्थानिक क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी बंद पाडले. नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून हे काम सुरू करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. हे काम नागरिकांचा विरोध डावलून करण्यात येत असल्याचे कुलाबा बॅकगार्डन बचाव समितीचे जितेंद्र तांडेल यांनी यावेळी सांगितले.

Colaba Ground Turf Controversy
Navi Mumbai Municipal Corporation: नवी मुंबई महापालिकेत सागर नाईक सभागृह नेते; विजय चौगुले विरोधी पक्षनेतेपदी पुनर्निवड

स्थानिक आमदार व विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांच्या अट्टहासामुळे कुलाब्यातील स्थानिक फुटबॉल खेळाडूंच्या भवितव्याशी खेळ केला जात आहे, असा संतप्त आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. कुलाब्यातील हे एकमेव नैसर्गिक पृष्ठभाग असलेले मैदान असून, याच मातीतून अनेक गुणवंत फुटबॉलपटू घडले आहेत.

या खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. आज त्याच मातीत कृत्रिम हस्तक्षेप करून त्या परंपरेचा गळा घोटण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना स्थानिकांमध्ये तीव्र आहे.

Colaba Ground Turf Controversy
Rajya Sabha Election Maharashtra: राज्यसभेच्या सहा जागांवर महायुतीचा विजय निश्चित : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मैदानाचे नैसर्गिक स्वरूप जतन करण्यासाठी स्थानिकांनी वारंवार निवेदने देऊन प्रशासनाकडे पुनर्विचाराची मागणी केली होती. मात्र कोणतीही सविस्तर चर्चा, लोकांशी संवाद किंवा संबंधितांना विश्वासात न घेता अचानक कामास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे परिसरात प्रचंड संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे. या मैदानाच्या पृष्ठभागात कायमस्वरूपी बदल करण्यापूर्वी स्थानिक क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, माजी खेळाडू आणि नागरिकांचे म्हणणे ऐकणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी होती.

Colaba Ground Turf Controversy
Regional Language Digital Content: डिजिटल युगात मातृभाषांचा वाढता प्रभाव; इंटरनेटवर प्रादेशिक कंटेंटचा दबदबा

काम सुरू झाल्याची माहिती मिळताच स्थानिक खेळाडू आणि नागरिक मैदानात दाखल झाले आणि शांततापूर्ण पद्धतीने काम बंद पाडले. काम थांबविल्याचे समजल्यानंतर कुलाबा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व स्थानिकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या दबावालाही न जुमानता स्थानिकांनी आपली भूमिका ठाम ठेवत काम थांबवून घेतले. मुंबई महानगरपालिकेकडून अद्याप कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नसल्याने स्थानिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती देवेंद्र तांडेल यांनी दिली.

Colaba Ground Turf Controversy
Mumbai Organ Donation: माय-लेकीच्या संवादातून अवयवदानाचा संकल्प

येथील मैदानाचा 5 हजार विद्यार्थी वापर करतात. यापैकी फुटबॉल खेळाडूंना टर्फची कमतरता भासत होती. त्यांनी केलेल्या मागणीनुसार महापालिकेकडून सदर मैदानात टर्फ बनविण्याचे काम सुरू आहे. कुलाब्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंना टर्फवर खेळता यावे, यासाठी काम सुरू आहे. एवढ्या वर्षांपासून त्यांनी काही न केल्याने आता त्यांच्या पोटात दुखत आहे. सदर टर्फ हे कुलाब्यातील खेळाडूंसाठी मोफत राहणार आहे.

मकरंद नार्वेकर, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news