Mobile Forensic Van | देशातील पहिल्या मोबाईल फॉरेन्सिक लॅबचे लोकार्पण

पुराव्यांशी छेडछाड करून आता कुणीही वाचणार नाही
Mobile Forensic Van
Mobile Forensic Van | देशातील पहिल्या मोबाईल फॉरेन्सिक लॅबचे लोकार्पण file photo
Published on
Updated on

मुंबई : Mobile Forensic Van | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी २१ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. राज्यात २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन तयार करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील २१ वाहनांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे हे व्हॅन कार्यान्वित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

सह्याद्री अतिथीगृह गृह येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात एकूण २५९ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करण्यात येणार आहे. त्यापैकी २१ पूर्णपणे सुसज्ज व्हॅन्स आता कार्यरत झाल्या आहेत. केंद्र सरकारने देशात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायदा लागू केला. या कायद्यानुसार सात किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांसाठी फॉरेन्सिक पुराव्यांचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. त्यानुसार मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने पुरावे गोळा करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची साठवणूक करणे आदी सुविधा या व्हॅनमध्ये असणार आहेत. त्यामुळे गुन्हे सिद्ध होण्याच्या प्रमाणात गुणात्मक फरक पडेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. एखादा गुन्हा घडल्यानंतर हे व्हॅन्स सर्वप्रथम घटनास्थळी दाखल होतील. या व्हॅनमध्ये रक्त, डीएनए संग्रहण आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यात आवश्यक पुरावे गोळा करता येणार आहे. वैज्ञानिक तज्ज्ञ व सहाय्यक कर्मचारी व्हॅनमध्ये असतील. तसेच स्फोटक पदार्थ तपासणी, सायबर गुन्ह्यांमध्ये तपासणीसाठी विशेष फॉरेन्सिक किट्स उपलब्ध असणार आहेत. तसेच व्हॅन सीसीटीव्हीने सज्ज असून ते पोलिस यंत्रणेशी जोडले जाणार आहे. त्यामुळे संबंधित पोलीस स्टेशनला सबंधित गुन्ह्याकामी गोळा केलेल्या पुराव्यांची माहिती देता येणे शक्य होणार आहे. ही एकत्र प्रणाली असून यामध्ये सुसज्ज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, फॉरेन्सिक किट्स, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि क्राईम सीन प्लिकेशन यांचा समावेश आहे. यामुळे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया अधिक कार्यक्षम आणि अचूक बनणार आहे. तपास यंत्रणा आणि फॉरेन्सिक तज्ञ यांच्यात उत्तम समन्वय साधला जाणार आहे. पुरावे नष्ट करणे, पुराव्यांशी छेडछाड करून आरोपींना शिक्षेपासून आता कुणीही वाचवू शकणार नाही.

असे काम करणार

फॉरेन्सिक मोबाईल व्हॅन जेव्हा गुन्हा नोंदविला जातो, तेव्हा नियंत्रण कक्ष फॉरेन्सिक पथकाला सूचित करेल. फॉरेन्सिक पथक गुन्हे स्थळाला भेट देवून ते गुन्ह्याची माहिती नोंदवून क्राईम सीन अॅप्लिकेशनमध्ये अद्ययावत करतील. फॉरेन्सिक तज्ज गुन्ह्याच्या ठिकाणी छायाचित्रे आणि व्हिडिओच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करतील. तसेच वरिष्ठ तज्ज्ञांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून पुराव्यांचे संकलन आणि तपासणी करून पुरावे पुन्हा तपासून सील केले करतील. त्यानंतर क्राईम सीन रिपोर्ट तयार करून पोलीस तपास अधिकाऱ्याकडे सुपूर्द केला जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news