बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांकडून कडक कारवाईचे आदेश

कायदा व सुव्यवस्था कोणीही हातात घेता कामा नये
CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे File Photo
Published on
Updated on

ऑनलाईन पुढारी डेस्क : बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी युपी तर एक आरोपी मध्यप्रदेशचा आहे. एक आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्याला लवकरच पोलिस त्याला ताब्यात घेतील. याबाबत पोलिस आयुक्तांशी बोलणे झाले असून कडक कारवाईचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

CM Eknath Shinde
राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांची गोळी झाडून हत्या

मुंबईमध्ये कायदा व सुव्यवस्था कोणीही हातात घेता कामा नये, गँगवार वैगेर डोके वर काढता कामा नये, यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला झाला त्याबद्दल कडक कारवाई करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (दि.१२) गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना रात्री सव्वानऊच्या सुमारास निर्मलनगर परिसरात घडली. त्यांचे पुत्र झिसान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. यामध्ये तीन- चार राऊंड त्यांच्यावर फायर करण्यात आले. यामध्ये एक गोळी त्यांच्या छातीला लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पंधरा दिवसापूर्वी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

CM Eknath Shinde
Baba Siddique : राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती..!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news