पुढारी ऑनलाईन डेस्क: Maharashtra CM Devendra Fadnavis | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (दि.१४) प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात (Maha Kumbh Mela 2025) पोहोचले. यावेळी त्यांनी सहकुंटुंब त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. प्रयागराज येथील अरैल घाटावर जाऊन त्यांनी संगमात आस्थेची पवित्र डुबकी घेतली. या संदर्भातील व्हिडिओ पीटीआयने पोस्ट केला आहे.
प्रयागराजमधील कुंभमेळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, आणि मुलगी दिवीजा फडणवीस यांनीदेखील त्रिवेणीच्या संगमात पवित्र स्नान केले. तसेच त्यांनी यावेळी त्रिवेणी संगम येथे आरती आणि प्रार्थना देखील केली.
ANI शी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "१४४ वर्षांनंतर होणाऱ्या तीर्थराज प्रयागच्या महाकुंभाच्या भव्य समारंभाची व्यवस्था. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या सरकारची ही एक मोठी कामगिरी आहे, एक हिंदू म्हणून मीही येथे पवित्र स्नान करण्यासाठी आलो आहे. अशी त्यांनी एक्स पोस्ट देखील केली आहे.