पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ पुन्हा घरवापसी करणार असून शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. भुजबळ यांनी ठाकरे गटातील नेत्यांची भेट घेतल्याचेही बोलले जात होते. मात्र भुजबळ आणि आमच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही आणि होण्याची शक्यताही नाही, असे सांगत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
एकेकाळी भुजबळ मोठे नेते होते, तेव्हा मुख्यमंत्री झाले असते. छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत, पण ते कोणत्या वाटेने येतात ती वाट काय आम्हाला दिसली नाही, असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. भुजबळ आधी शिवसेनेत होते, नंतर काँग्रेसमध्ये गेले त्यानंतर शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत राहिले, आता अजित पवार गटात आहेत. त्यांचा खूप मोठा प्रवास आहे. त्या प्रवासात शिवसेना खूप मागे राहिली आणि राजकीय प्रवासात मात्र शिवसेना खूप पुढे गेली आहे. शिवसेनेचा भुजबळ यांच्याशी कोणताही राजकीय संवाद झालेला नाही आणि होण्याची शक्यता नाही. कारण, त्यांनी स्वत: चा मार्ग निवडला असून त्यांची स्वतंत्र भूमिका आहे. अशा बातम्या पेरून राज्यात गोंधळ निर्माण करायचा आहे. शिवसेनेचा कोणताही नेता त्यांना भेटलेला नाही किंवा चर्चा झालेली नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :