Charni Road Girgaon Bridge: सैफी हॉस्पिटलविरोधात स्थानिकांचे आंदोलन

रुग्णालयाचा विरोध डावलून चर्नी रोड-गिरगाव पूल होणारच : मंत्री लोढा
Charni Road Girgaon Bridge
Charni Road Girgaon BridgePudhari
Published on
Updated on

मुंबई : चर्नी रोड - गिरगाव पुलाला विरोध करून जनतेला वेठीस धरणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात गिरगावकरांचा बांध फुटला. गिरगाव पूल बचाव समिती आणि मंगलवाडी - केळेवाडी रहिवासी संघटना यांच्या विद्यमाने शनिवार, 14 फेब्रुवारी 2026 रोजी सैफी सेल्फी हॉस्पिटलच्या गेटसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. गिरगावकरांच्या हक्कासाठी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढाही या आंदोलनात सहभागी झाले होते. गिरगावकरांच्या हक्कासाठी आंदोलनात सहभाग घेतला असून सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही पूल होणारच, असा निर्धार यावेळी मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.

Charni Road Girgaon Bridge
Maharashtra Farmer Loan: 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात मोठ्या संख्येने गिरगावकर रस्त्यावर उतरले होते. या हॉस्पिटल व्यवस्थापनाने गेली चार वर्षे पुलाचे काम रखडवले आहे. चर्नी रोड आणि गिरगावला जोडणाऱ्या पुलाअभावी गिरगावकर अतोनात हाल सहन करत आहेत. या ठिकाणी अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात दोन जणांचा हकनाक बळी गेल्याची माहिती गिरगाव पूल बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. दीड वर्षापूर्वी न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाचे काम सुरू झाले. मात्र पुन्हा सैफी हॉस्पिटलने मनमानी करून बांधकाम थांबवले आहे. आता मुंबई महापालिकेचा कारभार नव्याने सुरू झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष पुन्हा या मुद्यावर केंद्रित होण्यासाठी गिरगावकर रस्त्यावर उतरले असल्याचेही या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Charni Road Girgaon Bridge
Mumbai metro slab collapse | मुंबईत मेट्रोच्या स्लॅबचा तुकडा रोडवर कोसळला; दुर्घटनेत एक ठार, तीन जखमी

गिरगावमधील चर्नी रोड ते केळेवाडीपर्यंत पूल व्हावा, यासाठी कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गेली तीन वर्षे सातत्याने लढा दिला आहे. प्रशासकीय पातळीवर मुंबई महापालिका तसेच पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल प्रशासनाशीही त्यांनी बैठका घेतल्या आहेत.

Charni Road Girgaon Bridge
Maharashtra ST Workers | शिमग्याआधीच एसटी कर्मचार्‍यावर आली, बोंब मारण्याची वेळ

मुंबई महापालिकेकडे या पुलाचा पाठपुरावा करून मंत्री लोढा यांनी पालिकेकडून मान्यता मिळवली. त्यासाठी निधीची तरतूद देखील झाली. मात्र सैफी हॉस्पिटलने या पुलाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गिरगावकरांच्या प्रश्नाची दखल घेऊन मुंबई महपालिकेला पूल बांधण्यास परवानगी दिली. पालिकेने पुलाचे कामही सुरू केले. पुलाचे 60 टक्के काम पूर्ण होत असतानाच, पुन्हा सैफी हॉस्पिटल प्रशासनाने यात अडवणूक केली आहे. या विरोधात गिरगावकरांनी केलेल्या आंदोलनात मंत्री लोढा यांनी सक्रिय सहभाग घेऊन गिरगावकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news