Chandrakant Patil : नवीन शैक्षणिक धोरण सर्जनशीलतेस बळ देणारे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील / Higher and Technical Education Minister Chandrakant Patil
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील / Higher and Technical Education Minister Chandrakant PatilPudhari News Network
Published on
Updated on

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण युवा पिढीचे भवितव्य घडवणारे आहे. हे शैक्षणिक धोरण अतिशय व्यावहारिक तसेच सर्जनशीलतेस बळ देणारे आणि आधुनिक स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारे आहे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे डिझाईन क्षेत्रातील भविष्यातील संधीसाठी उर्मीज आर्ट फोरम तर्फे आयोजित नेक्स्ट इन डिझाईन फ्युचर या युएएफ एक्सपोचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

नवे शैक्षणिक धोरण व्यावहारिक असून, यात संशोधनावरही भर देण्यात आला आहे. याशिवाय नव उद्योजक, स्टार्टर्स अप यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जात असून, बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मदतही केली जात आहे. यातूनच स्टार्टर्स अपच्या क्षेत्रात भारत आघाडीवर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील / Higher and Technical Education Minister Chandrakant Patil
Education : शालेय शिक्षणात यंदा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण!

उर्मीजच्या कला मंचातर्फे डिझाइनला शालेय स्तरावरील सर्जनशीलता आणि करिअरच्या संधी यासंदर्भात एक्स्पोच्या माध्यमातून एकाच छताखाली पोर्टफोलिओ प्रदर्शन, करिअर समुपदेशन, विद्यापीठ भागीदारी, आणि उद्योग संवाद आयोजित करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारे असे उपक्रम प्रेरणादायी ठरतील आणि अशा युएएफ एक्स्पोमुळे महाराष्ट्रातील डिझाइन गुणवत्तेला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध होणार आहेत. मुलांच्या शिक्षणात आणि विकासात कला आणि सर्जनशील विषयांची भूमिका महत्त्वाची असते. डिझाइन हा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूचा अविभाज्य भाग बनला आहे, डिझाईन आता केवळ चित्रकलेपुरते मर्यादित न राहता विज्ञान, सौंदर्यशास्त्र, मानवी गरजा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणारे एक व्यापक व्यावसायिक क्षेत्र आहे. आजच्या युगात डिझाइन हे आर्टपेक्षा अधिक सायन्स झाले आहे. एक्स्पोचे आयोजन हे महाराष्ट्रातील सर्जनशीलतेला योग्य दिशा देणारे पाऊल आहे, असे मंत्री पाटील यावेळी सांगितले.

व्यासपीठावर आमदार पराग अळवणी, उर्मीज आर्ट फोरमच्या संस्थापिका, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कोमल उल्लाल, गुरुचरण सिंग संधू, क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू, मोहन वेदपाठक आदी उपस्थित होते.

मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती

भारताच्या प्रगतीचा पाया डिझाइन थिंकिंगमध्येच आहे. अभियांत्रिकी, वास्तुकला, उत्पादन, ॲनिमेशन, गेमिंग, डिजिटल कंटेंट, तंत्रज्ञान आदी सर्व क्षेत्रांत डिझाइन नवोपक्रमाची मुख्य ताकद बनली आहे. नवीन अभ्यासक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता एआर/व्हीआर बरोबर उद्योग-शैक्षणिक सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना हँड्स-ऑन, व्यावहारिक, प्रोजेक्ट-आधारित शिक्षण आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात येत आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news