Central Railway Grocery Stalls : मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मिळणार आता किराणा माल

किराणा स्टॉल्सवर विक्रीसाठी नसलेल्या वस्तूंच्या यादीचे मध्य रेल्वेने प्रमाणीकरण केले आहे.
Central Railway Grocery Stalls
Central Railway Grocery Stallspudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दररोजच्या आवश्यक किराणा वस्तू स्थानकातच खरेदी करणे शक्य व्हावे म्हणून मध्य रेल्वेकडून सर्व स्थानकांवर किराणा स्टॉल्ससाठी कंत्राटे दिली आहेत. रेल्वेच्या नॉन-फेअर रेव्हेन्यू अंतर्गत हे किराणा स्टॉल्स दिले जाणार आहेत. त्यासाठी किराणा स्टॉल्सवर विक्रीसाठी नसलेल्या वस्तूंच्या यादीचे मध्य रेल्वेने प्रमाणीकरण केले आहे.

या किराणा वस्तूंच्या यादीमध्ये तांदूळ, गहू, धान्ये, पीठ, कडधान्ये व डाळी, खाद्यतेल, साखर, गूळ, मीठ, मसाले, सुका मेवा यांचा समावेश आहे. तसेच पेयांमध्ये पॅकबंद पिण्याचे पाणी, ज्यूस, एनर्जी ड्रिंक्स, शीतपेये, पॅकबंद खाद्यपदार्थमध्ये बिस्किटे, पॉपकॉर्न, चिप्स, इन्स्टंट नूडल्स, रेडी-टू-ईट खाद्यपदार्थ, सॉस, जॅम आणि लोणची, पराठे, कटलेट, नगेट्स, आइस्क्रीम, टूथपेस्ट, डिटर्जंट, प्रसाधने आणि टिश्यू पेपर, नॅपकिन्स, टॉयलेट पेपर इत्यादीचा समावेश आहे.

Central Railway Grocery Stalls
Bombay High Court | आंदोलकांच्या पार्श्वभूमीची तपासणी आवश्यक : हायकोर्ट

अन्य आवश्यक वस्तूमध्ये बालकांसाठी डायपर, लहान मुलांचे अन्न, वाईप्स, पाळीव प्राण्यांचे अन्न व निगा राखण्यासाठीच्या वस्तू, स्टेशनरी आणि दैनंदिन वापराच्या लहान वस्तू इत्यादींची विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करणे सर्वांसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच कोणत्या वस्तूंची विक्री या किराणा स्टॉलवर करता येणार नाही हे सुद्धा मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Central Railway Grocery Stalls
Mumbai Mill Workers Housing Scheme : गिरणी कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आता ३ एफएसआय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news