

मुंबई: मध्य रेल्वेद्वारे आसनगाव-कसारा तिसरी रेल्वे मार्गिका आणि कसारा यार्ड लाईन विस्तारीकरणाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या १२ दिवसांचा विशेष ब्लॉक रविवारी पूर्ण होणार आहे.
त्यामुळे शनिवार ( १७ ऑक्टोबर ) दुपारी २:३० पासून ते रविवार ( १८ ऑक्टोबर ) पहाटे ३ वाजेपर्यंत असा १२ तास ३० मिनिटांचा हा ब्लॉक असणार आहे. या दरम्यान शनिवार-रविवारच्या मध्य रात्रीच्या सर्व गाड्यांवर परिणाम होणार आहे.
या मेल आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द
अमरावती-सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस
सीएसएमटी -साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेस
सीएसएमटी -धुळे एक्स्प्रेस
सीएसएमटी - नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस
सीएसएमटी - बल्हारशाह एक्स्प्रेस
सीएसएमटी -मनमाड पंचवटी एक्स्प्रेस
सीएसएमटी -अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस
मनमाड-सीएसएमटी - पंचवटी एक्स्प्रेस
धुळे-सीएसएमटी एक्स्प्रेस
साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस
बल्हारशाह-सीएसएमटी एक्स्प्रेस