बदलापूर शाळेतील १५ दिवसांचे CCTV फुटेज गायब, शिक्षणमंत्र्यांची माहिती

Badlapur Case | सीसीटीव्ही फुटेज गायब कसे झाले?
Badlapur School Case, Badlapur sexual assault
बदलापूर शाळेतील सीसीटीव्ही डीव्हीआर स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी ताब्यात घेतला होता. (Pudhari photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

बदलापूरमधील ज्या शाळेत दोन मुलींवर लैंगिक (Badlapur sexual assault) अत्याचार झाला; त्या शाळेतील गेल्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) गायब झाले आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांनी सोमवारी दिली. सीसीटीव्ही फुटेज कसे गायब झाले? आणि शाळेतील अधिकाऱ्यांचा संभाव्य सहभाग याचा तपास अधिकारी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळेतील १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब आहे. शिक्षण विभागाच्या चौकशीतून ही माहिती समोर आली असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले. "अत्याचार झालेल्या मुलीला १० लाख रुपये आणि अत्याचाराचा प्रयत्न झालेल्या मुलीला ३ लाख रुपये मदत दिली जाईल. दोघींच्या शिक्षणाचा खर्च आम्ही उचलू. दोन्ही मुलींना आम्ही मदत करू." असे केसरकर म्हणाले.

Badlapur School Case : विसंगतीची चौकशी सुरू

बदलापूरच्या शाळेतील (Badlapur school) घटना १३ ऑगस्ट रोजी घडली. पीडितेच्या आजोबांचे म्हणणे आहे की त्यांनी वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापकांना या घटनेबाबत माहिती दिली होती. पण कोणीही त्यांची दखल घेऊन कारवाई केली नाही. दरम्यान, या घटनेबाबत शाळा व्यवस्थापनाने १६ ऑगस्टला कळल्याचा दावा केला, तर पीडितांचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे की त्यांनी या घटनेबाबत १४ ऑगस्टला शाळेच्या निदर्शनास आणून दिले होते. या विसंगतीची चौकशी सुरू आहे, असे केसरकर म्हणाले.

३ आणि ४ वर्षांच्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान, राज्य नियुक्त समितीच्या प्राथमिक अहवालात, दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे म्हटले आहे.

कोणत्या त्रुटी ठरल्या बदलापूर घटनेला कारणीभूत?

या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला १७ ऑगस्ट रोजी अटक केली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्याची कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी न पाहता त्याला कंत्राटी पद्धतीवर नियुक्त केले होते आणि शाळेच्या सर्व परिसरात मुक्त प्रवेश होता. प्राथमिक चौकशी अहवालात या त्रुटी या घटनेला कारणीभूत ठरल्या आहेत.

नराधम अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

 दोन चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे याला कल्याण सत्र न्यायालयाने आज (दि. २६) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याला १७ ऑगस्ट रोजी अटक केल्यानंतर पहिल्यांदा न्यायालयाने तीन दिवसांचे कोठडी सुनावली होती. त्यानंतर राज्य शासनाने नेमलेल्या एसआयटीने पोलीस कोठडी वाढवून देण्याचे मागणी केल्यानंतर ५ दिवसांची पोलीस कोठडी वाढविण्यात आली होती. आज शिंदे याला कल्याण सत्र न्यायालयात हजर केले. (Badlapur School Rape Case)

Badlapur School Case, Badlapur sexual assault
बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपीविरुद्ध आणखी दोन कलमांची वाढ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news