बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपीविरुद्ध आणखी दोन कलमांची वाढ

Badlapur School Rape Case | अक्षय शिंदे याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Badlapur School Rape Case Update
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांची पोलिस कोठडीFile Photo
Published on
Updated on

बदलापूर : पुढारी वृत्तसेवा : दोन चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे याला कल्याण सत्र न्यायालयाने आज (दि. २६) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याला १७ ऑगस्टरोजी अटक केल्यानंतर पहिल्यांदा न्यायालयाने तीन दिवसांचे कोठडी सुनावली होती. त्यानंतर राज्य शासनाने नेमलेल्या एसआयटीने पोलीस कोठडी वाढवून देण्याचे मागणी केल्यानंतर ५ दिवसांची पोलीस कोठडी वाढविण्यात आली होती. आज शिंदे याला कल्याण सत्र न्यायालयात हजर केले. (Badlapur School Rape Case)

अत्याचार प्रकरणानंतर बदलापूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. प्रियेश जाधव यांनी अत्याचारग्रस्त चिमुरडींच्या पालकांचे वकील पत्र घेतले असून या प्रकरणात आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी कोर्टाकडे पोक्सो ॲक्ट कलम ६ आणि १० अधिक कलम वाढवण्याची केलेली विनंती कोर्टाने मान्य केल्याचेही ॲड. जाधव यांनी सांगितले. (Badlapur School Rape Case)

७० हून अधिक आंदोलकांना जामीन मंजूर

बदलापुरात पुकारलेल्या २१ तारखेच्या बंद दरम्यान बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम आणि कल्याण लोहमार्ग रेल्वे पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये ७० हून अधिक आरोपींना जामीन मिळाल्याची माहिती ॲड. जाधव आणि ॲड. प्रवीण अटकळे यांनी दिली. बदलापुरातील अटक झालेल्या आंदोलकांना बदलापूर आणि परिसरातील वकिलांनी मोफत वकीलपत्र घेऊन त्यांना कायदेशीर मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. (Badlapur School Rape Case)

Badlapur School Rape Case Update
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news