CBI,

CBI कडून अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल; अडचणी वाढणार?

देशमुखांनी ट्वीट करत फडणवीसांचे मानले आभार     
Published on

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे  ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshamukh) यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने पुन्हा एकदा त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी ट्वीट करून देवेंद्र फडणवीसांचे आभार मानले आहेत.

विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण : अनिल देशमुख 

सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांचे  आभार मानले आहेत. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की,

"धन्यवाद... देवेंद्रजी फडणवीस माझ्यावर CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता - न डगमगता मी CBIच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे. महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे !

देशमुख यांच्या अडचणी वाढणार?

सीबीआयकडून (CBI) अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यामुळे अनिल देशमुख यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेले काही दिवस माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सूरु आहेत. आज पुन्हा एकदा देशमुख यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले. गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांना धमकावल्या प्रकरणात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याने  देशमुख यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जाते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news