ठाकरे शिवसेनेच्या 'या' नेत्यावर गुन्हा दाखल

'महायुती' च्या उमेदवार करंजे यांच्यावर आक्षेपार्ह्य टीका करणे पडले महागात
Sunil Raut
सुनील राऊत
Published on: 
Updated on: 

विक्रोळी : विक्रोळी विधानसभेतील महायुतीच्या उमेदवार सुवर्णा करंजे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे ठाकरेंची शिवसेना व महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील राऊत यांना महागात पडले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर विक्रोळी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.४) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

Sunil Raut
Lok Sabha Election 2024 : आघाडीत बिघडले होते… महायुतीत पुन्हा जुळले!

सुनील राऊत यांनी २७ ऑक्टोंबर रोजी टागोरनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात महायुतीच्या उमेदवार करंजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. त्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये याबद्दल संताप होता. त्यानंतर याप्रकरणी सोमवारी (दि ४) महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विक्रोळी पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर करंजे यांच्या तक्रारीवरून विक्रोळी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.४) रात्री उशिरा राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Sunil Raut
वर्धा : नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यानंतर कळणार कोण रिंगणात

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news