Byculla Flyover: भायखळा पुलाचे काम लांबणीवर; मे २०२८ची डेडलाईन चुकणार

जे. जे. परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे बांधकाम आव्हानात्मक; कामाच्या वेगावर प्रश्नचिन्ह
Byculla Flyover
Byculla FlyoverPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: भायखळा जे. जे. परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या भायखळा उड्डाणपुलाच्या कामाने म्हणावा तेवढा वेग पकडलेला नाही. या पुलाचे काम बांधकामाच्या दृष्टीने आव्हानात्मक असल्यामुळे मे २०२८ची पूल पूर्ण होण्याची डेडलाईन चुकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भायखळा येथील सीताराम सिलम उड्डाणपूल (वाय ब्रिज) ते जे. जे. उड्डाणपूल यांना जोडणाऱ्या जे.जे. मार्ग आणि साबू सिद्दीकी तंत्रनिकेतन महाविद्यालय जंक्‍शन येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.

Byculla Flyover
Nitesh Rane: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीमागे एफसीआरए विधेयक रोखण्याचा अजेंडा; नितेश राणेंचा आरोप

उड्डाणपुलाच्या मुख्य केबल - स्टे व वायाडक्ट भागाची एकूण रचना २ अधिक २ लेन स्वरूपाची आहे. केबल - स्टे भागाची लांबी सुमारे २३० मीटर, तर वायाडक्टची लांबी ३१२ मीटर आहे. या संरचनेच्या बांधकामामध्ये आरसीसी तसेच स्ट्रक्चरल स्टेनलेस स्टील या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

अलीकडेच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी या पुलाची पाहणी करून, कामाला गती देण्याचे निर्देश दिले होते. परंतु आव्हानात्मक कामामुळे ही डेडलाईन पाच ते सहा महिने पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या पुलाचे ३० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Byculla Flyover
Mumbai Koliwada Demarcation: मुंबईतील सात कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा मार्ग मोकळा; तीन महिन्यांत शासनाला अहवाल

वाहतूक कोंडी सुटणार

उड्डाणपुलामुळे सर जमशेटजी जीजीभाई मार्गासह भायखळा, नागपाडा, माझगाव या दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या वाहतूक पट्ट्यातील जंक्शनवरील कोंडी कमी होणार आहे. त्याशिवाय या मार्गावरील प्रवास जलद होणार असून इंधनाचीही बचत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news