Nitesh Rane: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीमागे एफसीआरए विधेयक रोखण्याचा अजेंडा; नितेश राणेंचा आरोप

मुंबईतील पत्रकार परिषदेत नितेश राणेंची विरोधकांवर टीका; आंदोलनामागील हेतूवरून राजकीय आरोप
Nitesh Rane
Nitesh Rane pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन हा केवळ बहाणा आहे. मूळ कारण म्हणजे परकीय देणग्यांच्या नियमनाशी संबंधित ‘एफसीआरए’ विधेयक रोखणे हाच काँग्रेस, सीजेपी व विरोधकांचा अजेंडा आहे, असा आरोप राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी केला आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Nitesh Rane
Mumbai Koliwada Demarcation: मुंबईतील सात कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा मार्ग मोकळा; तीन महिन्यांत शासनाला अहवाल

मंत्री राणे पुढे म्हणाले, परकीय निधी मिळवणाऱ्या काही घटकांवर ‘एफसीआरए’ विधेयकामुळे निर्बंध येण्याची शक्यता असल्याने त्यांना संरक्षण देण्यासाठी विरोधक आंदोलन करत आहेत. ध्रुव राठी यांच्यासारख्या परदेशी नागरिकांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करू नयेत.

अभिजीत दिपके यांच्या यापूर्वीच्या जंतरमंतरवरील आंदोलनावेळी २०० पाकिस्तानी समाजमाध्यम खात्यांचा सहभाग आढळला होता, असा आरोपही त्यांनी केला.

मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण ही प्रक्रिया राबवण्यात आली होती, मग आताच विरोध का. मतचोरीचे आरोप सिद्ध होत असतील, तर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या निवडून आलेल्या खासदारांनी राजीनामे द्यावेत, असे आव्हान राणे यांनी दिले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news