BSc Nursing admission : बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवर

नोंदणीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
BSc Nursing admission
बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पुन्हा लांबणीवरFile Photo
Published on
Updated on

मुंबई ः राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) राबवली जाणारी बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया तिसर्‍या फेरीनंतर पुन्हा एकदा लांबली आहे. बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 7 आणि 8 एप्रिल रोजी घेतली होती. यंदा बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी 15,760 जागाजास्त उपलब्ध आहेत.

या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी राज्यभरातून 47 हजार 501 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 43 हजार 191 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती. त्यापैकी फक्त 14,167 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केले.

तिसर्‍या फेरीपर्यंत राज्यातील 15 हजार 760 जागांपैकी 9 हजार 25 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पण अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 5 हजार 142 विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत.

नर्सिंग महाविद्यालयांना नोंदणीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ मिळाल्याने ही प्रक्रिया रखडली असून चौथ्या फेरीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले.

BSc Nursing admission
Hit and run case Mumbai | वरळी हिट अ‍ॅण्ड रनप्रकरणी पोलिसांच्या तपासात निष्काळजीपणा : प्रदीप नाखवा
  • सीईटी कक्षाने ही प्रवेश प्रक्रिया 25 जुलैला सुरू केली होती. या अभ्यासक्रमाची तिसरी फेरी 15 सप्टेंबरला पूर्ण झाली. त्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा थांबवली. तिसर्‍या फेरीपर्यंत अर्ज दाखल केलेल्या 14,167 विद्यार्थ्यांपैकी 9025 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. आता चौथ्या फेरीसाठी 6,735 जागा उपलब्ध असून 5,142 विद्यार्थ्यांचे प्रवेश होणे बाकी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news