मुंबई
मार्मागोवा युद्धनौकेवरून ‘ब्रह्मोस’ची चाचणी यशस्वी!
मुंबई; वृत्तसंस्था : भारतीय नौदलातील आयएनएस मार्मागोवा या नव्या युद्धनौकेवरून रविवारी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. हल्लेखोर क्षेपणास्त्राचा ब्रह्मोस क्षेपणास्त्राने अचूक वेध घेतला आणि ते हवेतच नष्ट केले.
मार्मागोवा म्हणजे गोवागौरव
- भारतीय नौदलाच्या युद्धनौका रचना विभागाने आयएनएस मार्मागोवाची रचना केली आहे.
- गोव्यातील पोर्ट सिटी मुरगाववरून या युद्धनौकेचे नामकरण करण्यात आले आहे.
- गोवा मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला 18 डिसेंबर 2022 रोजी ती नौदलात दाखल झाली.
- गोवा 60 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना या युद्धनौकेने आपला पहिला प्रवास केला.
ब्रह्मोसवर नजर
- हे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. ते पाणबुडी, जहाज, विमान किंवा जमिनीवरून डागता येते.
- जमिनीवरून किंवा समुद्रातून डागल्यानंतर ब्रह्मोस तासी 2500 कि.मी. वेगाने टार्गेट उद्ध्वस्त करू शकते.
- ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाणबुडीतून 40-50 मीटर खोलवरून डागता येते.
हेही जाणून घ्या…
- 163 मीटर व रुंदी 17 मीटर असलेली ही युद्धनौका भारतातील आजवरची सर्वाधिक शक्तिशाली युद्धनौका.
- 75 टक्के स्वदेशी बनावटीची ही युद्धनौका असून, अशा आणखी 4 युद्धनौका तयार केल्या जात आहेत.

