Doctor Assault Case| 6 ऑगस्टपर्यंत रमेश म्हात्रेचा मुक्काम जेलमध्येच, ओळख परेड होईपर्यंत बाहेर सोडता येणार नाही: हायकोर्ट

म्हात्रे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, तक्रारदार आणि साक्षीदारांना धमकावण्याचे प्रकार आणि मारहाण झालेल्या पीडित डॉक्टरांची सुरक्षा या मुद्यांवर हायकोर्टाने म्हात्रे यांना आरोपींची ओळख परेड होईपर्यंत तूर्तास बाहेर सोडण्यास नकार दिला.
Dombivli Doctor Assault Case
Dombivli Doctor Assault CasePudhari
Published on
Updated on

मुंबई: डॉक्टरांना मारहाण करणारा गुंड नगरसेवक रमेश म्हात्रेला दिलासा देण्यास हायकोर्टाने पुन्हा एकदा नकार दिला. म्हात्रे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, तक्रारदार आणि साक्षीदारांना धमकावण्याचे प्रकार आणि मारहाण झालेल्या पीडित डॉक्टरांची सुरक्षा या मुद्यांवर हायकोर्टाने म्हात्रे यांना आरोपींची ओळख परेड होईपर्यंत तूर्तास बाहेर सोडण्यास नकार दिला.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने रमेश म्हात्रे यांच्या जामिनावरील स्थगिती उठवण्यास नकार देत या प्रकरणाची सुनावणी ६ ऑगस्टला निश्चित केली.

Dombivli Doctor Assault Case
Unused Acquired Land Review: रखडलेल्या प्रकल्पांच्या जमिनी सरकारजमा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली होती. तसेच, सुट्टीच्या दिवशी (शनिवारी) विशेष सुनावणी घेऊन म्हात्रे याला कल्याण दंडाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या जामिनाला स्थगिती दिली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली.

यावेळी नगरसेवक रमेश म्हात्रे याच्यावतीने ज्येष्ठ वकील आभात पोंडा यांनी आपल्याला तडीपार करा पण जेलमधून मुक्त करा याचा पुनर्विचार करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार आरोपीला जामीन देताना त्याची पार्श्वभूमी नाही तर केवळ त्या संबंधित केसचा विचार केला जातो. त्यामुळे दिलेला जामीन अश्यापद्धतीने अधिककाळ स्थगित करता येणार नाही, असा दावा केला.

Dombivli Doctor Assault Case
Anna Bhau Sathe Memorial: अण्णा भाऊ साठे स्मारकाचे २०२९ मध्ये मोदींच्या हस्ते करू लोकार्पण; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

तर अडव्होकेट जनरल मिलिंद साठे यांनी सांगितले की, मारहाण झालेली पीडित महिला डॉक्टर इतकी बिथरलीय की, तिने रूग्णालया येणेच बंद केल आहे. आम्ही तिला धीर देत असून अद्याप तिचा राजीनामा स्वीकारलेला नाही अशी माहिती प्रशासनाच्यावतीने दिली.

या सुमोटो याचिकेत न्यायालयाला मदत करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अमायकस क्युरी ॲड. अशोक मुंदुरगी यांनी घडलेला गुन्हा हा काही आरोपीला जन्मठेपेची शिक्षा देण्याइतका गंभीर नाही. मात्र आरोपीची पार्श्वभूमी पाहता पीडित डॉक्टरांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. अजून तपास पूर्ण झालेला नाही, साक्षीदारांचे जबाब नोंदवणे अद्याप बाकी आहे असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news