Mumbai Metro Project Safety : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांवर अपघाताच्या सात घटना

हायकोर्टाने एमएमआरडीएकडून मागवला अहवाल
Bombay High Court
Bombay High CourtPudhari
Published on: 
Updated on: 

मुलुंड : मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि कमल खाटा यांच्या खंडपीठाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) सर्व सात घटना आणि मेट्रो प्रकल्पाच्या ठिकाणी घेतलेल्या सुरक्षा उपाययोजनांचा तपशीलवार अहवाल सादर करण्यास सांगितले.

फेब्रुवारी महिन्यात मुलुंड येथे झालेल्या अपघातानंतर ॲड. रुजू ठक्कर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. बुधवारच्या सुनावणीदरम्यान, याच कालावधीत मेट्रो २ बी, मेट्रो ४ आणि मेट्रो ९ प्रकल्पांच्या ठिकाणी झालेल्या सात अपघातांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

Bombay High Court
Mumbai University : मुंबई विद्यापीठाकडून बौद्ध भन्तेंचा पदव्युत्तर प्रवेश रद्द

ठाणे-मुंबई प्रवेशद्वाराजवळ, आनंद नगर-साकेत उन्नत मार्गालगत १७ ऑक्टोबरला अपघात झाला. त्यावेळी एका धावत्या गाडीवर लोखंडी सळ्यांचा सांगाडा कोसळला होता. गाडीतील एक महिला आणि चालक गंभीर जखमी झाले, तर वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

याचिकाकर्त्यांनी सांगितले की, या घटनांमुळे मेट्रो बांधकाम स्थळांवरील सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत आणि वारंवार होणाऱ्या अपघातांची दखल घेण्याची न्यायालयाला विनंती केली.

Bombay High Court
Sunday Mega Block Mumbai : मध्य, हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक

पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला

एमएमआरडीएचे ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी म्हणाले, याचिकाकर्त्यांनी नमूद केलेल्या घटनांना उत्तर देणारे एक अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल करेल. प्राधिकरणाला आपले उत्तर दाखल करण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आणि पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला निश्चित केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news