Mumbai Bomb Threat | मुंबईतील विविध दंडाधिकारी न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर
Bomb Threat
Bomb ThreatFile Photo
Published on
Updated on

Magistrate Courts Bomb Threat Email Mumbai

मुंबई: राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील विविध दंडाधिकारी न्यायालयांना (Magistrate Courts) बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या धमकीच्या सत्रानंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर आल्या आहेत.

ईमेलद्वारे मिळाली धमकी

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील न्यायालयांना एका अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे ही धमकी पाठवली आहे. या ईमेलमध्ये न्यायालयाच्या इमारतींमध्ये बॉम्ब ठेवल्याचा आणि त्या उडवून देण्याचा उल्लेख करण्यात आला होता. ईमेल मिळताच संबंधित प्रशासनाने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली.

Bomb Threat
मुंंबई : बनावट नोटा बनविणारी कर्नाटकची टोळी गजाआड

खबरदारी म्हणून कामकाज थांबवले

धमकीचे गांभीर्य लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून अनेक न्यायालयांमधील कामकाज तात्काळ थांबवण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाच्या इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. यामुळे न्यायालय परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

तपास यंत्रणांकडून शोधमोहीम सुरू

धमकी मिळताच स्थानिक पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) घटनास्थळी दाखल झाले आहेत. तपासणी पथकाकडून श्वान पथकाच्या साहाय्याने न्यायालयाच्या कानाकोपऱ्याची कसून तपासणी केली जात आहे. धमकीचा ईमेल नेमका कोठून आला आणि त्याचा आयपी (IP) ॲड्रेस काय आहे, याचा शोध मुंबई पोलिसांचे सायबर सेल घेत आहे.

Bomb Threat
Ratnagiri Accident News : मुंबई-गोवा महामार्गांवर तुरळ येथे भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

पोलीस प्रशासनाचे आवाहन

स्थानिक पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. ही केवळ अफवा आहे की घातपाताचा मोठा कट, याचा तपास सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. अद्यापपर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही, मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस सर्व यंत्रणा तैनात ठेवण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news