BMC action against illegal tree cutting-विनापरवाना झाडे कापणाऱ्यांवर महापालिका गुन्हे दाखल करणार

वृक्ष संवर्धन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका
BMC news
BMC newsPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय झाड व फांद्या कापताना दिसल्यास थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनो जरा सावधान.. अन्यथा पोलीस स्टेशनला खेपा माराव्या लागतील. एवढेच नाही तर जेलची हवाही खावी लागेल.

BMC news
Goregaon Mulund Link Road deadline|गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्याला फेब्रुवारी २०२९ चा मुहूर्त

मुंबईतील झाडांचे संरक्षण आणि पर्यावरणीय समतोल अबाधित राखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने वृक्ष संवर्धन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. झाडांच्या फांद्या अथवा एखाद्या धोकादायक झाड कापण्यासाठी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून अधिकृत परवानगी दिली जाते. परंतु या परवानगीचा काहीजण गैरवापर करत झाडे व फांद्यांची कत्तल करतात. एवढेच नाही तर विनापरवाना झाडे कापली जातात. याला लगाम घालण्यासाठी पालिका सतर्क झाली आहे.

BMC news
Mumbai Airoli Katai road | ऐरोली-कटाई नाका उन्नत रस्त्याचे दोन टप्पे तयार

ऑगस्टमध्ये दिंडोशी मेट्रो स्थानकाजवळील शितल तपोवन हाऊसिंग सोसायटी संकुलाबाहेरील झाडांना इजा पोहचवल्या प्रकरणी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी आणि विकासकाविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. उद्यान खात्याला पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या भागाची वेळोवेळी पाहणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या.

नागरिकांनी सतर्क राहावे

महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्षांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ मधील कलम ८ सह कलम २१ अन्वये पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तरतूद आहे. कोणत्याही झाडाला इजा पोहोचविणे, विषारी द्रव्ये अथवा इंजेक्शन देणे, झाडे तोडणे किंवा नष्ट करणे हे कायद्याने दंडनीय अपराध आहेत. अशा प्रकारच्या घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित विभागाला माहिती देऊन पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

पालिकेने दिलेल्या परवानगीनुसार झाडांची छाटणी होते की नाही, याचा अहवाल तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दिलेल्या परवानगीपेक्षा झाड अथवा झाडांच्या फांद्या कापल्या गेल्या तर ताकदीने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे निर्देश उद्यान अधीक्षकांकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे विनापरवाना झाडे कापू नका, असे आवाहन पालिकेने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.