Mumbai Road Development : कांदिवलीतील वाहतूक कोंडी फुटणार!

१५ वर्षांपासून रखडलेल्या रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा
Mumbai Road Development
कांदिवली : रस्ता रुंदीकरणासाठी तब्बल २७ बांधकामे हटवण्यात आली. (छाया : अनिल चासकर)
Published on: 
Updated on: 

कांदिवली : पश्चिम उपनगरातील कांदिवली परिसरातील दिवसेंदिवस वाढणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आर/दक्षिण विभागाने रस्ता रुंदीकरणाच्या कामांना वेग दिला आहे. याचाच एक भाग म्हणून मथुरादास रोड व एस. व्ही. रोड जंक्शन परिसरातील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी तब्बल २७ बांधकामे १७ नोव्हेंबर रोजी हटवण्यात आली.

या कारवाईमुळे सुमारे ११० मीटर लांबीच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळणार असून वाहन चालकांसह प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Mumbai Road Development
FDA Raid : नवी मुंबई, पालघरमध्ये एफडीएचे छापे

कांदिवली पश्चिमेला मथुरादास रोड आणि एस. व्ही. रोड जंक्शन येथील हे रुंदीकरण गेल्या १५ वर्षांपासून बाधित बांधकामांमुळे रखडले होते. अखेर महापालिकेने १७ नोव्हेंबर रोजी सकाळी सकाळी १० वा. प्रत्यक्ष निष्कासनाची कारवाई करत स्वामी विवेकानंद मार्गावरील १८ व मथुरादास मार्गावरील ९ दुकाने जमीनदोस्त केली.

यामुळे महत्त्वपूर्ण रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती मिळाली आहे. या कामामुळे कांदिवली रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मथुरादास रोड तसेच एस. व्ही. रोडवरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सदर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी महापालिकेने चार जेसीबी यंत्रे, ४० कामगार व १० अभियंत्यांची नियुक्ती केली होती. तसेच बांधकामे हटवताना धुळीमुळे होणारे वायुप्रदूषण रोखण्यासाठी वायुप्रदूषण नियंत्रण नियमावलीनुसार मिस्ट मशीनच्या साहाय्याने पाण्याची फवारणी करण्यात आली.

स्थानिक नगरसेवक धवल वोरा यांनीही गेले ९ महिने रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका अधिकाऱ्यांसह सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांच्याशी वारंवार बैठक घेऊन चर्चा करून बाधित व्यावसायिकांशी संपर्क साधून सातत्याने प्रयत्न केले होते.

Mumbai Road Development
Floating Palace Mumbai : समुद्रात शाही विवाह सोहळ्यासाठी उभारला जातोय जलमहाल

परिमंडळ-७ चे उपायुक्त मनीष वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली आर/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त आरती गोळेकर यांनी या कारवाईचे नियोजन केले. कार्यकारी अभियंता कल्पक मर्दे, सहाय्यक अभियंता अमोल गावित आणि सह-अभियंत्यांनी प्रत्यक्ष कारवाईची जबाबदारी पार पाडली.

गेल्या दीड दशकापासून रखडलेल्या या रस्ता रुंदीकरणाला अखेर सुरुवात झाल्याने कांदिवलीतील वाहतूक व्यवस्थेला दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.