बीएमसी रुग्णालयातील निवासी डॉक्टर 'या' तारखेपासून सामूहिक रजेवर जाणार

प्रलंबित मागण्यांसाठी निर्णय
BMC Hospital
बीएमसी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. File Photo

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : बीएमसी शासित रुग्णालयांमध्ये कार्यरत निवासी डॉक्टरांनी त्यांच्या वसतिगृह निवास, स्टायपेंड वाढ आणि महागाई भत्ता आदी प्रलंबित मागण्यांसाठी २२ जुलैपासून सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय आज (दि. ९) घेतला आहे.

BMC Hospital
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

रुग्णांमध्येही चिंतेचे वातावरण

या मागण्यांसाठी सतत प्रयत्न सुरू असतानाही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत, ज्यामुळे डॉक्टरांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. रुग्णालय प्रशासनाने या समस्यांवर त्वरित तोडगा काढावा, अशी डॉक्टरांची मागणी आहे. या सामूहिक सुट्टीमुळे रुग्णालयातील सेवांवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे रुग्णांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news