BMC action against littering : पालिकेच्या कनिष्ठ पर्यवेक्षकांचे प्रमोशन की डिमोशन!

अस्वच्छता करणाऱ्यांवरील कारवाईचे काम मारले कनिष्ठ पर्यवेक्षकांच्या माथी; परिपत्रकही काढले
BMC action against littering
BMC Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई शहर अस्वच्छ व उपद्रव करण्याऱ्यांविरोधात आता मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. उपद्रव करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचे काम कनिष्ठ पर्यवेक्षक अर्थात ज्युनियर सुपरवाईजर यांच्या गळ्यात मारले आहे. तसे परिपत्रकही काढले आहे. यामुळे पालिका प्रशासनाने त्यांचे प्रमोशन केले की डिमोशन, अशी चर्चा पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात रंगली आहे.

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी मुंबई महानगरपालिकेने उघड्यावर थुंकणे, रस्त्यावर कचरा फेकणे, ओला व सुका कचरा वर्गीकरण न करणे, उघड्यावर अंघोळ करणे, लघूशंका करणे आणि विना परवाना राडारोड्याची वाहतूक करणे अशी विविध नियमांची उपविधी 2025 लागू करून दंड आकारणी करण्याचे जाहीर केले आहे. परंतु यासाठी महापालिकेतील सुमारे 400 ज्युनियर सुपरवाईजरवर ही जबाबदारी सोपविली आहे.

BMC action against littering
Mumbai Crime : वंचितच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा

परिणामी, त्यांच्याकडील असलेली दत्तक वस्ती योजनेतील गटार, लहान नाले, वस्तीतील पायवाटा आणि शौचालयाची स्वच्छता आदी कामे बारगळण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे पालिकेच्या विभाग कार्यालयातील कनिष्ठ पर्यवेक्षकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

घनकचरा विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षकांची ड्युटी सकाळी 6.30 वाजल्यापासून सुरु होते. ती दुपारी 1.30 वाजेपर्यंत असते. मात्र दैनंदिन रिपोर्ट तयार करणे, सेक्शनमधील कामे करण्यास त्यांना सायंकाळचे 5 वाजतात. अशावेळी त्यांच्याकडून दंड वसूलीचे काम कसे करून घ्यायचे, असा प्रश्न विभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंत्यांनादेखील पडला आहे. मुंबई महापालिकेने उपविधी -2025 लागू केला असून त्याची 11 फेब्रुवारीपासून अमंलबजावणी होणार आहे. परंतु त्या उपविधीमधील अनेक उपद्रव करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई गेल्या अनेक वर्षांपासून वॉर्डातील उपद्रवशोधक (एन.डी.) कर्मचारी करत आहेत.

BMC action against littering
Matheran rickshaw strike : गिरिस्थान माथेरानची चाके उद्यापासून थांबणार
  • प्रत्येक वॉर्डमध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागातील ज्युनियर सुपरवाईजर यांच्या जागा रिक्त असून कार्यरत ज्युनियर सुपरवाईजर त्या अख्त्यारित असलेले बीटसह इतर सेक्शन बघावे लागते. उपद्रव नागरिकांवर कारवाईसाठी ज्युनियर सुपरवाईजरला विशिष्ट रंगाचा गणवेश, दुचाकी आणि टॅब देण्यात येणार असल्याने त्यांच्याकडून दिवसभर उपद्रव करणारे नागरिकांवरील कारवाई करण्याचे टार्गेट दिले जाणार आहे. परिणामी नागरी वस्तीमधील स्वच्छतेचे तीनतेरा वाजण्याची भीती दत्तक वस्ती योजनेतील संस्थाचालकांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news