BMC Engineer Transfers: महापालिकेत राजकीय शिफारशीने २२५ अभियंत्यांच्या बदल्या; नगर अभियंता विभागावर राजकीय वरदहस्त!

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस शहर अभियंता कार्यालयाने सविस्तर यादी दिली आहे.
Transfer
TransferPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या शहर अभियंता विभागावर राजकीय वरदहस्त असून अनेक अभियंत्यांच्या बदल्यांसाठी, नियुक्त्यांसाठी मर्जीच्या विभागात पदस्थापना करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून शिफारशी केल्या जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

२२५ अभियंते आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांच्या नावांसमोर मंत्री, आमदार, खासदार, उपमहापौर तसेच नगरसेवकांची नावे नमूद आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांस शहर अभियंता कार्यालयाने सविस्तर यादी दिली आहे.

Transfer
Fire Brigade Uniform: अग्निशमन दलातील जवानांच्या गणवेश खरेदीचा मार्ग मोकळा; महापालिका १६ कोटी रुपये खर्च करणार

माहिती अधिकारातून उपलब्ध झालेल्या २२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नावांसमोर नमूद राजकीय शिफारशींच्या प्राथमिक विश्लेषणात काही राजकीय व्यक्तींची नावे वारंवार आढळून आली आहेत.

यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या नावाचा सर्वाधिक १० वेळा उल्लेख असून त्यानंतर रामदास आठवले यांच्या नावाचा ९ वेळा, तर गिरीश महाजन आणि कालिदास कोळंबकर यांच्या नावांचा प्रत्येकी ८ वेळा उल्लेख आहे.

तसेच मंगेश कुडाळकर, अण्णा बनसोडे आणि तुकाराम काते यांच्या नावांचा प्रत्येकी ६ वेळा उल्लेख करण्यात आला आहे. मुरजी पटेल, दिलीप लांडे यांच्या नावाचा ५ वेळा तर नरहरी झिरवळ, सुमीत वानखेडे, राहुल शेवाळे, प्रकाश सुर्वे, इंद्रनील नाईक, संतोष बांगर, राम कदम, प्रकाश सुर्वे, किशन कथोरे आणि बच्चू कडू यांच्या नावांचा प्रत्येकी ४ वेळा, तर चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, भरत गोगावले, उदय सामंत, परिणय फुके, रविंद्र वायकर, प्रसाद लाड, सुनील प्रभू, महेश सावंत यांच्या नावांचा प्रत्येकी ३ वेळा उल्लेख आहे.

Transfer
Parcel Scam: पार्सलच्या नावाने फोन, एक कोड आणि WhatsApp खाते हायजॅक; सायबर ठकांचा नवा डाव

याशिवाय प्रताप राव जाधव, पंकजा मुंडे, मंगल प्रभात लोढा, रावसाहेब दानवे, संजय घाडी, राहुल नार्वेकर, जयकुमार गोरे, आणि सना मलिक यांच्या नावांचा प्रत्येकी २ वेळा, तर रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, आणि संजय बनसोडे यांच्या नावांचा प्रत्येकी १ वेळा उल्लेख आढळतो. या यादीमध्ये सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता, कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंता या संवर्गातील अभियंत्यांचा समावेश आहे.

मंत्र्यांच्‍या शिफारशीनुसार प्रशासनाने केल्‍या ‘या’ अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या बदल्‍या

किशोर धागर : (गिरीश महाजन), रवींद्र दरेकर ( अण्णा बनसोडे (विधानसभा उपाध्यक्ष), प्रकाश सुर्वे, प्रशांत जगताप (इंद्रनील नाईक, हसन मुश्रीफ); पद्माकर चव्हाण-( मकरंद पाटील), नेहा नितीन सांखे-( उदय सामंत); निलेश परब( मनिषा चौधरी, गिरीश महाजन); महेश नांदेकऱ-( राधाकृष्ण विखे पाटील); संदीप देसाई-( संजय शिरसाट); अभय सांख्ये-( चंद्रशेखर बावनकुळे); सचिन दुधभाते-( भरत गोगावले); रोशन झेमसे-(एकनाथ शिंदे); अक्षय दुधाण-( एकनाथ शिंदे); प्रशांत पाथारे -(एकनाथ शिंदे); अंगराज गणपत-( एकनाथ शिंदे), सचिन कुलकर्णी (नरहरी झिरवळ); मनोज दुबे (नरहरी झिरवळ).

धीरज करांडे (मंगलप्रभात लोढा); सुधाकर चव्हाण (गिरीश महाजन); सुशांत पाटील( हसन मुश्रीफ); आनंद जाधव-(एकनाथ शिंदे); अमित गहाणे-(एकनाथ शिंदे); सचिन सांगळे (पंकजा मुंडे) ; विकास सोनुने-( उदय सामंत), निलेश काळंबे ( चंद्रशेखर बावनकुळे); अकबर खान (छगन भुजबळ); सतीश करांडे (राहुल नार्वेकर); सुदीप शिंदे (अण्णा बनसोडे); निखिल नालवडे (शंभूराज देसाई); मिलिंद शाव्ही ( एकनाथ शिंदे, अतुल थोपटे, प्रविण तायडे), सागर पाटील ( रामदास आठवले); प्रदीप काजरोलकर (मकरंद पाटील); क्षितिजा यावली (राधाकृष्ण विखे पाटील); विशाल पाटील- (अण्णा बनसोडे), दिनेश नांचे-( रामदास आठवले, दीपक जाधव (अण्णा बनसोडे), साईनाथ गलवाड-(डॉ. भागवत कराड, गिरीश महाजन, अबू आझमी), अर्जुन सुळाणे ( आकाश फुंडकर).

राजेंद्र राठोड -(शिवेंद्रराजे भोसले); हरीश चव्हाण- (अण्णा बनसोडे); संतोष भिलारे ( नरहरी झिरवळ); मिथुन भिसे (जयकुमार गोरे); विश्वनाथ माने (भरतशेठ गोगावले); राकेश शिंदे (अण्णा बनसोडे) ; वैभव निंबाळकर (गणेश नाईक); सागर मोरे ( गिरीश महाजन); प्रकाश शिंगारे-( मेघना बोर्डीकर); राकेश कुमार झा (एकनाथ शिंदे), प्रदीप चंदनशिवे (जयकुमार गोरे); पल्लवी ताटेकर (मकरंद पाटील);युवराज बेळेकर (प्रकाश आबिटकर); अमोल पाटील ( दत्तात्रय भरणे); सुनील साळुंखे (पंकजा मुंडे); जगदीश तुपे (संजय शिरसाट), अरविंद कदम (राधाकृष्ण विखे पाटील)

धनश्री हुसेकर ( नरहरी झिरवळ); दीपक मुंढे ( गिरीश महाजन); प्रविण तिरकेकर-(एकनाथ शिंदे); विवेक पाटील-(माधुरीताई मिसाळ); रवी गुप्ता-(चंद्रशेखर बावनकुळे); मयूर पाटील-(भरतशेठ गोगावले); वलसंगीकर अब्दुल मतीन (शिवेंद्रराजे भोसले, महेंद्र थोरवे); निलेश नरकर (गुलाबराव पाटील); अमित पाटील (चंद्रकांत पाटील); संतोष घवारे-(एकनाथ शिंदे); शाहबाज पिरजादे (हसन मुश्रीफ); शालका खाडे (संजय बनसोडे), रोहित शेलकांडे (गिरीश महाजन), कार्तिक गांधी (मेघना बोर्डीकर).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news