BMC property seizure : 11 मालमत्तांचे होणार लिलाव

जाहीर नोटीस; सात दिवसांची अंतिम मुदत
BMC property seizure
BMC Pudhari Photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्या 11 मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार थकबाकीदारांना जाहीर नोटीस काढण्यात आली असून सात दिवसांत मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर सबब न ऐकता थेट मालमत्ता लिलाव करण्यात येणार आहे.

मालमत्ता कर भरण्यासंदर्भात अनेकदा नोटीस बजावून, वैयक्तिक चर्चा करूनही कर भरण्याकडे या अकरा थकबाकीदारांनी दुर्लक्ष केले आहे. यात फोर्ट येथील सुमेर असोसिएट यांच्याकडे 131 कोटी 20 लाख 98 हजारांचा मालमत्ता कर थकीत आहे. या मालमत्ता धारकाला 57 कोटी 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे या मालमत्ता धारकाला 188 कोटी 46 लाख रुपये भरावे लागणार आहेत.

BMC property seizure
Mumbadevi Temple Chaitra Navratri : श्री मुंबादेवी मंदिरात आजपासून चैत्र नवरात्र उत्सव

अन्य 10 मालमत्ता धारकांकडेही करोडो रुपयांचा कर थकीत आहे. अंधेरीच्या राजहंस असोसिएशन या व्यावसायिक बिल्डींगला दंडात्मक कारवाईसह 47 कोटी रुपये वसूल करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

BMC property seizure
Prakash Abitkar : राज्यात लवकरच 1400 डॉक्टर्सची होणार भरती

कर थकवणारे अकरा जण

  • सुमेर असोसिएशन : 188 कोटी 46 लाख

  • राजहंस असोसिएशन : 47 कोटी 2 लाख

  • शारदा को-ऑपरेटिव्ह सोसा. : 64 लाख

  • रामचंद्र हेमंत सकपाळ : 1 कोटी 4 लाख

  • अब्दुल हुसेन 1 : 9 कोटी 39 लाख

  • अब्दुल हुसेन 2 : 4 कोटी 15 लाख

  • सुमेर बिल्ड क्रोप : 85 कोटी 38 लाख

  • पि.के. मोदी : 2 कोटी 14 लाख

  • एस सी मेहतानी : 9 कोटी 76 लाख

  • सेंट फिटर चर्च : 12 कोटी 64 लाख

  • हरदेवी राजपाल : 6 कोटी 49 लाख

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news