BMC Assistant Commissioner Transfer| मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या होणार

मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या होणार
BMC news
BMC newsPudhari
Published on
Updated on

मुंबई : प्रकाश साबळे

चेंबूर, साकीनाका दुर्घटना आणि मुंबईची झालेली तुंबई यामुळे महानगरपालिकेच्या कारभारांची मलिन झालेल्या प्रतिमा सुधारण्यासाठी आता महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त यांच्या अंतर्गत बदल्या करण्याचे ठरविले आहे. तसा प्रस्ताव तयार झाला असून महापालिकेच्या मुख्यालयात हालचाली सुरु झाल्या आहेत. जुलै महिन्यातील शेवटच्या तारखेपर्यंत या बदल्या निर्गमित होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

BMC news
Mumbai | वाहतूक सुरु होण्यापूर्वीच झाडलोट करण्याचे निर्देश

मुंबई महानगरपालिकेत २६ विभाग कार्यालये आहेत. या सर्व विभाग कार्यालयात स्वतंत्र सहाय्यक आयुक्त आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेक विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांचे विभागातील कारभारांवर नियंत्रण राहिलेले नाही. तसेच विभागात भेटी देणे, पाहणी करणे असे दौरेसुद्धा कमी झाले आहेत. परिणामी निष्क्रिय सहाय्यक आयुक्तांची त्यांच्याकडे असलेल्या सध्याच्या वॉर्डातून बदली करण्यात येणार आहे. अशाप्रकारे ७ ते ८ सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या होणार असल्याची माहिती महानगरपालिकेतील सूत्रांनी दै. पुढारीशी बोलतांना दिली.

BMC news
Mumbai Western Railway |परेचा वक्तशीरपणा घसरला

चेंबूर येथील दुर्घटनेमुळे टीकेच्या धनी ठरलेल्या अश्विनी भिडे यांनी ४ अभियंत्यांचे निलंबन केले होते. तर साकीनाका मॅनहोल दुर्घटनाप्रकरणी एल विभागातील सहाय्यक आयुक्त यांना निलंबित केले आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी सकाळी वॉर्डातील आकस्मिक भेटीसुद्धा केल्या आहेत. या भेटीमध्ये त्यांना वॉर्डातील अनेक समस्या, सहाय्यक आयुक्तांचा कामांमध्ये असलेला हलगर्जीपणा दिसून आलेला आहे. या सर्व बाबी लक्षात घेत त्यांनी आता किमान ७ ते ८ सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवीन सहाय्यक आयुक्तामुळे गोंधळ मुंबई महानगरपालिकेत गेल्या वर्षांभरापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) पास होऊन आलेल्या सहाय्यक आयुक्त पालिकेच्या कारभारांवर अद्यापही म्हणावी तशी पकड निर्माण करू शकले नाही. परिणामी त्यांचा विभागात काम करतांना गोंधळ उडत आहे. नगरसेवक आणि आमदार यांच्या सततच्या दबावामुळे त्यांची काम करतांना धांदल उडत आहे. काही सहाय्यक आयुक्त हे सहाय्यक अभियंता आणि स्वीय सहाय्यक यांच्या सांगण्यानुनार काम करतांना दिसून येत आहे.

विभागातील सहायक आयुक्तांच्या बदल्या !

के. पूर्व विभागात एच. पश्चिम विभागातील सहाय्यक आयुक्त दिनेश पल्लेवाड प्रभारी आहेत.

एल. विभागातील सहाय्यक आयुक्त निलंबित केल्याने तिथेही प्रभारी सहाय्यक आयुक्त आहेत.

एम. पश्चिम विभागातील सहाय्यक आयुक्त चेंबूर दुर्घटनामुळे पायउतार होऊ शकतात.

के. पश्चिम विभागातील सहाय्यक आयुक्त नागरिकांना न भेटणे, विभागात दुर्लक्ष असल्याचा परिणाम

एम.पूर्व, आर. दक्षिण आणि मालमत्ता विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news