Malad Blinkit Food License Suspended: ‘ब्लिंकिट’चा अन्न परवाना निलंबित; मालाडमधील गोदामात झुरळांचा संचार

मुदतबाह्य अन्नसाठा, घाणीत ठेवलेले पदार्थ
Malad Blinkit Food License Suspended
Malad Blinkit Food License SuspendedPudhari
Published on
Updated on

मुंबई: ऑनलाइन किराणा व खाद्यपदार्थांची अत्‍यंत गतीने घरपोच सेवा देणाऱ्या ब्लिंकिटच्या मालाड (पश्चिम) येथील गोदामात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, झुरळांचा प्रादुर्भाव, अयोग्य अन्नसाठवणूक तसेच मुदतबाह्य व खराब पॅकेजिंगचा माल आढळून आला. परिणामी एफडीएने ब्लिंकिटचा अन्न परवाना तातडीने निलंबित केला आहे.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मालाड पश्चिमेतील रामचंद्र लेन येथील सर्वोदय भवनातील गाळा क्रमांक ए-०३, प्लॉट क्रमांक ३८, ३९ व ४० येथे असलेल्या ब्लिंकिटच्या डार्क स्टोअरवर ही कारवाई करण्यात आली.

Malad Blinkit Food License Suspended
Mukhyamantri Teerth Darshan Yojana: महायुती सरकारकडून १९ हजार ज्येष्ठांना तीर्थदर्शनाचा लाभ

पथक पोहोचले तेव्हा तिथे गोदामातील भाजीपाला व फळांवर झुरळांचा संचार आढळून आला. कीटक व उंदरांवर कोणत्‍याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्‍या. गोदामात अन्नपदार्थ थेट जमिनीवर तसेच गंजलेल्या रॅक्सवर ठेवण्यात आले होते. अन्न स्वच्छता व सुरक्षिततेचा पत्ता नव्हता.

Malad Blinkit Food License Suspended
Maharashtra Politics: पक्ष मजबूत करण्यासाठी ठाकरे बंधूंचे सप्टेंबरनंतर राज्यभर दौरे

कोल्ड रूममध्ये मुदतबाह्य अन्नपदार्थ ठेवलेले होते. पॅकेजिंगशी छेडछाड झालेली पाकिटे साठवून ठेवण्यात आल्याचेही आढळले.अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी झाल्याच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या. कर्मचाऱ्यांकडे ग्लव्ह्ज, मास्क यांसारखी संरक्षणात्मक साधने नसल्याचेही तपासणीत आढळले. या गंभीर त्रुटींची दखल घेत ब्लिंकिटचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news