BJP leaders lockdown case : लॉकडाऊन निर्बंधांचे उल्लंघन; भाजप नेत्यांवरील गुन्हे रद्द करण्यास नकार

गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात दोन एफआयआर, सुनील राणे यांच्याविरुद्ध पाच आणि मनीषा चौधरी यांच्याविरुद्ध एक एफआयआर दाखल
BJP leaders lockdown case
Bombay High Courtfile photo
Published on
Updated on

मुंबई : कोरोना लॉकडाऊन दरम्यान दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याची मागणी करणाऱ्या माजी खासदार गोपाळ शेट्टी, माजी आमदार सुनील राणे आणि दहिसर येथील विद्यमान आमदार मनीषा चौधरी यांच्यासह अन्य भाजप नेत्यांनी दाखल केलेल्या आठ याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने भाजप नेत्यांना दिलासा देण्यास नकार दिला.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने काही कठोर निर्बंध लागू केले होते. त्या निर्बंधांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून भाजपच्या नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात दोन एफआयआर, सुनील राणे यांच्याविरुद्ध पाच आणि मनीषा चौधरी यांच्याविरुद्ध एक एफआयआर दाखल केला होता.

BJP leaders lockdown case
Mumbai residential sales : मुंबईत 3 महिन्यांत 24 हजार 706 घरांची विक्री

भाजप नेत्यांविरोधातील गुन्हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्या भाजप नेत्यांच्या वकिलांनी केला. सार्वजनिक हितासाठी केलेल्या निदर्शनांनंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. न्यायालयाने ते रद्द करावेत, अशी विनंती वकिलांनी केली. तथापि मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या खंडपीठाने त्यांची विनंती मान्य करण्यास नकार दिला.

BJP leaders lockdown case
Mumbai police township project : मुंबईतील 75 भूखंडांवर पोलिसांसाठी टाऊनशिप

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news