Maharashtra Election 2024 : भाजप-१५०, अजित पवार-६० ,शिंदे गट-७० जागा

भाजपने तयार केला जागावाटपाचा फॉर्म्युला
BJP has prepared a seat sharing formula for the assembly elections
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र ( फॉर्म्युला) तयार केला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. Pudhari News Network
Published on
Updated on
नरेश कदम

मुंबई | Maharashtra Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने महायुतीच्या जागा वाटपाचे सूत्र ( फॉर्म्युला) तयार केला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. भाजप 150 पेक्षा अधिक जागा लढविणार असून अजित पवार गटाला 60 आणि एकनाथ शिंदे गटाला 70 जागा देण्यात येणार आहे.

BJP has prepared a seat sharing formula for the assembly elections
Wayanad landslide | केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, ६० जणांचा मृत्यू, शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकले

नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी झालेल्या चर्चेतून हा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. या जागा वाटपात झाल्याच तर चार- पाच जागा मागेपुढे होतील, असेही सूत्रांनी सांगितले.भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्याकडील विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या गटाला सोडल्या जातील. मात्र काही जागा याला अपवादही ठरतील, असेही वृत्त आहे.

BJP has prepared a seat sharing formula for the assembly elections
Income Tax Return : ‘झिरो रिटर्न’ का भरावे?

पवारांची 90 वरून 60 वर घसरण

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले तेव्हा भाजपच्या नेत्यांनी त्यांना विधानसभेच्या 90 जागा देण्याचा शब्द दिला होता. परंतु त्यांना जास्त जागा देवून जोखीम उठविण्यासाठी भाजपचे नेतृत्व तयार नाही. अजित पवार गटाच्या वाट्याला 60 च्या आसपास जागा येतील. यात विद्यमान आमदार आणि काही अपक्ष आमदारही आहेत.

BJP has prepared a seat sharing formula for the assembly elections
K.V.N.Naik Sanstha Election | 'केव्हीएन' नाईक संस्था सभासदांकडून सर्वसमावेशक कौल

शिंदे गटाला 100 ची अपेक्षा, 70 वर बोळवण

मुख्यमंत्री शिंदे यांनी 100 जागांची मागणी केली होती, पण त्यांच्या वाट्याला 70 च्या आसपास जागा येतील. शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतल्या जिंकलेल्या जागांचे गणित भाजपच्या नेतृत्वापुढे मांडले. तसेच शिंदे यांच्याकडे उमेदवारही नाहीत. त्यामुळे 70 जागांची लक्ष्मणरेखा भाजपने त्यांच्यासाठी आखली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news