Bishnoi Gang Case-बिश्नोई टोळीवरून पोलिसांची कोंडी

तपास अधिकाऱ्याला मोक्का न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस
Bishnoi
Bishnoi Pudhari
Published on
Updated on

मुंबई : माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा फटकार बसली आहे. विशेष मोक्का न्यायालयाने या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावत, न्यायालयाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी का झाली नाही, याचे स्पष्टीकरण मागितले आहे. या घडामोडीमुळे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या अनमोल बिश्नोईच्या चौकशीबाबत मुंबई पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

Bishnoi
Illegal AI Content Removal-बेकायदेशीर 'एआय' कंटेंट ३ तासांत हटवावा लागणार

न्यायालयाने यापूर्वी अनमोल बिश्नोईला चौकशीसाठी न्यायालयासमोर हजर करण्यासाठी तसेच त्याचा ताबा मिळविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व कायदेशीर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, सुनावणीदरम्यान या आदेशांनुसार अपेक्षित प्रगती झालेली नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

दरम्यान, दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात असलेल्या अनमोल बिश्नोईचा ताबा मिळविण्यासाठी मुंबई पोलिसांनी दिल्लीतील न्यायालयात अर्ज केला होता. सुरक्षेच्या कारणास्तव एनआयएने मुंबई पोलिसांना ताबा देण्याबाबत विरोध केला होता. त्यानंतर, मुंबई पोलिसांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे एका बाजूला दिल्ल न्यायालयाकडून ताबा मिळालेल नसताना, दुसऱ्या बाजूला विशे मोक्का न्यायालयाकडू चौकशीतील प्रगतीबाब स्पष्टीकरण मागविण्यात आल्यान तपास यंत्रणेसमोर कायदेशीर आणि प्रक्रियात्मक आव्हाने निर्माण झाल् आहेत.

Bishnoi
Marathi Dialects Preservation-आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मराठी बोलीभाषांचे होणार जतन

मुंबई पोलिसांसमोरील मोठी आव्हाने

दिल्ली न्यायालयाने अनमोल बिश्नोईचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यास नकार. विशेष मोक्का न्यायालयाकडून चौकशीतील प्रगतीबाबत सातत्याने पाठपुरावा. न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी का झाली नाही, याबाबत तपास अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस. अनमोल बिश्नोईची चौकशी अद्याप रखडल्याने तपासाच्या पुढील टप्प्यावर परिणाम होण्याची शक्यता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news