

मुंबई : राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने गुरुवारी (दि. २२) एक अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ३० जून २०२६ पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. 'पुढारी न्यूज'शी बोलताना त्यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली.
"शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आली असून, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर ३० जूनच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल," असे कृषिमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले.