Bhoodan Land Case: ठाणे, रायगडमधील भूदान जमिनी बळकावल्याच्या चौकशीसाठी एसआयटी

ठाणे जिल्ह्यातील तीन प्रकरणांची चौकशी; रायगडमधील कुंडेवहाळ येथील जमिनीचीही चौकशी
Bhoodan Land Case
Bhoodan Land CasePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: ठाणे व रायगड जिल्ह्यातील भूमिहीन शेतकऱ्यांसाठी दान करण्यात आलेल्या भूदान जमिनी बनावट दस्तऐवजांच्या आधारे बळकावल्याच्या चार प्रकरणांची चौकशी करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठित करून चौकशीचे निर्देश दिले आहेत.

संबंधित जमिनींची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून कागदपत्रांची तपासणी करावी आणि वस्तुस्थिती स्पष्ट करणारा सुस्पष्ट अहवाल सादर करावा. संपूर्ण चौकशी ४५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश बावनकुळे यांनी दिले.

ठाणे जिल्ह्यात नवयुगा, ह्युंडाई मोटर्स आणि ब्रिस्टो दाबा मैफिल ढाबा यांच्याशी संबंधित भूदान जमिनींच्या प्रकरणांचा एसआयटीच्या चौकशीत समावेश आहे.

रायगड जिल्ह्यातील मौजे कुंडेवहाळ, तालुका पनवेल येथील सर्वे क्रमांक ३५ मधील एकूण ९ हेक्टर ९९ आर क्षेत्राच्या भूदान जमिनीच्या प्रकरणाचाही एसआयटीच्या चौकशीत समावेश आहे. सुरेंदर पाल सिंग ब्राईट व इतर यांनी ही जमीन बळकावल्याची तक्रार आहे.

Bhoodan Land Case
Supriya Sule: 'बाबा रुग्णालयात आहेत...' सुप्रिया सुळेंनी घेतला मोठा निर्णय; संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला कधी जाणार? महत्त्वाची अपडेट

या चारही प्रकरणांमध्ये मूळ भूदान लाभार्थ्यांना जमिनींचे वाटप झाले होते का, आज त्या जमिनी कोणाच्या ताब्यात आहेत, त्यांचे हस्तांतरण अधिकृतरीत्या झाले आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. जमिनींच्या वापराचे मूळ प्रयोजन बदलण्यात आले आहे का, त्यावर कोणते आर्थिक बोजे निर्माण करण्यात आले आहेत का आणि वाटपाच्या अटी व शर्तींचा भंग झाला आहे का, याचीही पडताळणी करण्यात येणार आहे.

काही प्रकरणांत वर्ग-२ च्या जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यात आले असल्यास त्याची तपासणी करून नियमानुसार अशा जमिनी पुन्हा वर्ग-२ करण्याबाबत कार्यवाही करावी. नियमबाह्य हस्तांतरण आढळल्यास संबंधित जमिनी शासनजमा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Bhoodan Land Case
Mumbai Tree Cutting : मुंबईकर ५० वर्षे जुनी ३४२ झाडे गमावणार

जिल्हाधिकाऱ्यांची देखरेख

भूदान जमिनींसंदर्भातील चौकशी, अभिलेखांची पडताळणी, अतिक्रमण हटविणे आणि जमिनींचा ताबा घेण्यासह संपूर्ण कार्यवाहीची जबाबदारी संबंधित प्रांताधिकाऱ्यांकडे असेल. नियमबाह्य ताब्यात असल्याचे निष्पन्न झालेल्या जमिनींचा ताबा १५ दिवसांत घेण्याची कार्यवाही करावी. या संपूर्ण प्रक्रियेवर संबंधित जिल्हाधिकारी देखरेख ठेवतील, असे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.

कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी

या विशेष तपास पथकाचे अध्यक्ष कोकण विभागीय आयुक्त असतील. या पथकामध्ये ठाणे जिल्हाधिकारी, नोंदणी व मुद्रांक विभागाचे उपमहानिरीक्षक, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, मुंबई उपनगर आणि रायगड पोलीस अधीक्षक यांचा समावेश असेल. रायगडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी हे पथकाचे सदस्य सचिव असतील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.