

Local Train Accident भांडूप रेल्वे स्टेशनमध्ये एसी लोकलच्या धडक बसल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर ही धक्कादायक घटना घडली. येथील रेल्वे रुळ ओलांडत तरुणाला एसी लोकलची जोरदार धडक बसली. ही लोकल मुंबईहून ठाणेमार्गे कल्याणच्या दिशेने जात होती. धक्कादायक बाब म्हणजे ज्या तरुणाला धकड बसलेल्या तरुणला या एसी लोकलने जवळपास १५ ते २० मिनिटे फरफटत पुढे नेल्याची प्राथमिक माहिती कळत आहे. साहिल थिटे असं २१ वर्षीय या तरुणाचं नाव आहे तो मुंलूडचा रहिवासी आहे.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील माहिती घेत आहे. या घटनेने प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. पुढील तपास रेल्वे पोलिसांनी सुरु केला आहे. मृत तरुणाच्या कुटुंबियांसोबत संपर्क करण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे. मध्य रेल्वेच्या खोळंब्यामुळे तरुणाचा नाहक बळी गेला आहे. यामुळे आता संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी माहिती दिली की साहिल थिटे हा भांडुप स्थानकातील चार क्रमांकाच्या फलाटावरून दोन क्रमांकाच्या फलाटावर जाण्यासाठी निघाला होता. याचवेळी मुंबईहून ठाणेमार्गे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलची धडक बसली.