BEST Electric AC Bus: मुंबईकरांच्या सेवेत १५०० एसी मिडी बस; भाडेतत्‍वावर बस घेण्‍यास बेस्ट समितीची मंजुरी

६०.२५ प्रति कि.मी दर
BEST Electric AC Bus
BEST Electric AC BusPudhari
Published on
Updated on

मुंबई: नवीन १५०० वातानुकूलित मिडी इलेक्ट्रिक एसी बस भाडेतत्‍वावर घेण्‍यास मंगळवारी बेस्ट समितीने मंजुरी दिली. यापैकी वर्षभरात २२५ बस बेस्‍टच्‍या ताप्‍यात दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान ई-बस सेवा अंतर्गत या बस ६०.२५ प्रति कि.मी दराने घेण्‍यात येणार आहेत.

या बस सेवेत आल्‍यास याचा मोठा फायदा अरुंद रस्त्याने मेट्रो व उपनगरीय रेल्वेसाठी प्रवास करणाऱ्या बेस्ट प्रवाशांना होणार आहे.

नवीन १५०० वातानुकूलित मिडी इलेक्ट्रिक एसी बसचा प्रस्ताव मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यावरील चर्चेत भाजपा सदस्य सुनिल गणाचार्य यांनी या १५०० बस कोणत्या कंपनीच्या आहेत ? त्यासाठी ४०० ते ५०० बस चालक कोठून आणणार ? यासाठी किती निविदा काढल्या जाणार आहेत ?

BEST Electric AC Bus
BMC School Bag Delay: महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना दप्तरासाठी ऑगस्टपर्यंत प्रतीक्षा?

यासाठी देण्यात येणारे ७ हजार कोटींची तरतूद बेस्ट प्रशासन कोठून करणार ? असे अनेक प्रश्न गणाचार्य यांनी उपस्थित करत करारामधील संभाव्य धोके स्पष्ट केले. केंद्र सरकारने मुंबईची तुलना ही इतर शहराबरोबर करू नये अशी विनंती त्यांनी केली.

त्यावर बेस्टच्या महाव्यवस्थापक डॉ.सोनिया सेठी यांनी उत्तर दिले. केंद्रासोबत केलेल्या या करारात वर्षभरात २२५ बेस्ट मिळण्याची शाश्वती असल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व प्रक्रिया राष्ट्रीय स्तरावर आहे. या नवीन बसेस बेस्टच्या जुन्या ४,५०० वातानुकूलित बेस्टच्या कराराव्यतिरिक्त असणार आहेत.

BEST Electric AC Bus
Jogeshwari Sadhus Assault: जोगेश्वरीत संशयावरून चार साधूंना मारहाण; दोघांना घेतले ताब्‍यात

दोन वेगवेगळे कंत्राटदार १०० आणि १५० बसेसचा पुरवठा करणार आहेत. या बससाठी ३७५ कोटी एवढे अनुदान केंद्र देणार आहे. यासाठी समितीने ६०.२५ प्रति कि.मी दराला मान्यता दिल्याने नवीन गाड्या बेस्टच्या ताफ्यात येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news