Belasis Flyover Opening Delay: बेलासिस उड्डाणपूल उद्घाटन रखडले; मनसेचा महापालिकेला फेब्रुवारीअखेरचा इशारा

मुंबई सेंट्रल–ताडदेव दळणवळणावर परिणाम; पूल तातडीने खुला न केल्यास आंदोलनाचा इशारा
Belasis Flyover Opening Delay
Belasis Flyover Opening DelayPudhari
Published on
Updated on

मुंबई : मुंबई सेंट्रल आणि ताडदेव विभागाला जोडणारा ऐतिहासिक बेलासिस पूल पाडून त्या जागी आता नव्याने पूर्वीपेक्षा अधिक सुसज्ज असा उड्डाणपूल महापालिकेतर्फे बांधण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात या पुलाचे उद्घाटन मुंबई महापालिकेच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्या हस्ते होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु कुठे तरी माशी शिंकल्याने या पुलाचे उद्घाटन काही काळ पुढे ढकलण्यात आल्याने ताडदेव व मुंबई सेंट्रल परिसरात राहणाऱ्या आणि असंख्य रेल्वे प्रवाशांना याचा फटका बसत असल्याच्या तक्रारी मनसे कार्यालयात प्राप्त झाल्या आहेत.यामुळे मनसेने महापालिकेला पत्र पाठवून फेब्रुवारी अखेरपर्यंत बेलासिस पूल नागरिकांसाठी खुला करण्याची मागणी विभाग अध्यक्ष दिनेश पुंडे यांनी पत्राद्वारे केली आहे. अन्यथा ग्रँट रोड पुलाप्रमाणे बेलासिस पुलही नागरिकांच्या रहदारीसाठी कायदा हातात घेऊन खुला करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Belasis Flyover Opening Delay
Borivali Jeweller Extortion Case: बोरिवलीत लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने खंडणी; ज्वेलर्सला धमकी देणारे चौघे जेरबंद

पत्रात काय म्हटले आहे ?

बेलासिस पूल गेल्या दोन महिन्यांपासून बांधून पूर्ण झाला असला तरी जनतेसाठी अजून खुला करण्यात आला नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. जनतेची दिशाभूल करण्यासाठी पुलावर थातूरमातूर काम करत असल्याचा दिखावा करण्यात येत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

Belasis Flyover Opening Delay
BMC Education Budget: महापालिकेचा 4,248 कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प; ‘मिशन सफल’द्वारे व्हिजन 2027ला गती

सदर पुलाची पाहणी केली असता हा पूल पूर्णत: वाहतुकीसाठी तयार असून फक्त श्रेयाच्या राजकारणासाठी अजूनपर्यंत त्याचे उद्घाटन करण्यात आले नाही, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सदर पूल हा अतिशय मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे ताडदेव येथील रहिवाशांना मुंबई सेंट्रल स्टेशनकडे तसेच बस डेपोकडे जाताना फार मोठा वळसा घालून जावे लागत आहे. नागरिकांच्या या त्रासाला महापालिका प्रशासन पूर्णत: जबाबदार असल्याचे मनसेने म्हटले आहे. आम्ही या पत्राद्वारे प्रशासनाला जाहीर इशारा देत आहोत की फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जर हा पूल नागरिकांसाठी खुला करून देण्यात आला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हा पुल जनतेसाठी खुला केला जाईल. कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा अशी आमची इच्छा नाही.

Belasis Flyover Opening Delay
Mumbai Fire Brigade Budget: मुंबईत अग्निशमन दलाला मोठी बळकटी; अर्थसंकल्पात 119 कोटींची वाढ

पण वेळप्रसंगी जनतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही थराला जाऊ शकते याचा प्रत्यय महापालिकेला नक्कीच देण्यात येईल. आपण या पत्राची गांभीयने दखल घ्यावी ही नम्र विनंती, असा सज्जड इशाराच मनसे मलबारहिल पदाधिकाऱ्यांतर्फे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता (उड्डाण पूल) बृहन्मुंबई महापालिका,वरळी हब, मुंबई यांना पत्राद्वारे देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news