BDD Chawl Redevelopment: बीडीडी चाळींच्या न्हाणीघरात वास्तव्य करणाऱ्यांनाही घर मिळणार

वर्षानुवर्षे केले होते अनधिकृत वास्तव्य; आता मिळणार हक्काचे घर
Home
Home(Pudhari File Photo)
Published on
Updated on

मुंबई: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात चाळी रिकाम्या करताना काही कुटुंबे अनधिकृतपणे वास्तव्यास असलेली आढळली आहेत. चाळींतील न्हाणीगृहात वर्षानुवर्षे या कुटुंबांचे वास्तव्य आहे. अशा दोन कुटुंबांचा समावेश बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील चाळ क्रमांक १८ रिक्त करण्यात आली त्यावेळी पहिल्या मजल्यावरील मध्यवर्ती न्हाणीगृहामध्ये मालन बडेकर वास्तव्यास अनधिकृतपणे होत्या. त्यांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत घर मिळवण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले.

Home
Doctor Assault Case: डॉक्टर मारहाण प्रकरणी अटक होताच शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पडले आजारी

त्यामुळे बडेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयीन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि म्हाडाचे प्रतिनिधी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार याचिकाकर्त्या ही जागा १९८५पासून गेली ४० वर्षे निवासी कारणासाठी वापरत असल्याचा निष्कर्ष निघाला. यानुसार बडेकर यांना पुनर्विकास प्रकल्पासाठी पात्र ठरवण्यात आले आहे.

बडेकर यांच्या उदाहरणाचा आधार घेऊन जयश्री बनसोडे यांनीही पुनर्विकसित सदनिकेसाठी आपल्याला पात्र ठरवण्याची विनंती केली होती. त्या चाळ क्रमांक ६१मध्ये तळमजल्यावरील न्हाणीगृहात वास्तव्यास होत्या.

बनसोडे यांच्या दाव्यानुसार त्या स्वत: १९९४पासून व त्यांचे वडील १९२४ सालापासून येथे वास्तव्यास आहेत. मात्र १९९४ सालचे पुरावे त्यांना सादर करता आले नाहीत. त्यामुळे बनसोडे या अपात्र ठरत आहेत.

Home
OC Abhay Scheme: मुंबईतील ३५०० इमारतींच्या ओसीचा मार्ग मोकळा

परंतु, १ जानेवारी २००० पूर्वीच्या सर्व निवासी संरचनांचा झोपडीधारक म्हणून या प्रकल्पात समावेश करण्यात येत असल्याने बनसोडे या २५ चौरस मीटरच्या सदनिकेसाठी पात्र ठरल्या आहेत.

आता बीडीडी चाळींच्या न्हाणी घरात राहिलेल्या कुटुंबांचेही भाग्य उजाडल्याने सर्व रहिवाशी आता टॉवरमध्ये एकत्र आलेले दिसतील, अशी भावना अनेकांनी व्‍यक्त केली. हा एकूणच प्रकल्प या अर्थाने चर्चेचा विषय झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news